Bandu Andekar | पुण्यातील (Pune) कुख्यात आंदेकर टोळीचे (Andekar Gang) युद्ध संपले असे वाटत असतानाच, गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी रक्ताचा सडा पडला. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने (Bandu Andekar) ‘खुनाचा बदला खून’ या न्यायाने, आपल्याच १९ वर्षीय नातवाचा, आयुष कोमकरचा (Ayush Komkar), गोळ्या झाडून खून घडवून आणला. या घटनेने पुणे पोलिसांचा (Pune Police) अंदाज पूर्णपणे चुकल्याचे उघड झाले आहे.
पुणे पोलिसांचा अंदाज पूर्णपणे चुकल्याचे उघड :
गेल्या वर्षी, आंदेकर कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याची हत्या झाली होती. ही हत्या वनराजच्या बहिणींनी आणि त्यांच्या पतींनी (कोमकर कुटुंब) केली होती.
यानंतर, पोलिसांनी कोमकर कुटुंबाला अटक केल्याने, टोळीयुद्ध संपेल आणि आंदेकर टोळी शांत बसेल, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, गुन्हेगारी कोळून प्यायलेल्या बंडू आंदेकरने सर्वांनाच धक्का दिला.
Bandu Andekar | आयुषवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता :
बंडू आंदेकरने “तुम्ही माझ्या मुलाला मारले, आता पुढचा नंबर तुमच्या मुलाचा” असा न्याय लावत, आपल्याच निष्पाप नातवाचा, आयुष कोमकरचा, बदला घेतला. आयुषवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता आणि तो गुन्हेगारी विश्वापासून दूर होता. त्यामुळे, आजोबाच नातवाचा जीव घेतील, अशी कल्पना पोलिसांनी केली नव्हती. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत ही चूक मान्य केली आहे.
आयुषवर ९ गोळ्या झाडल्यानंतर, मारेकऱ्यांनी “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर” अशा घोषणा दिल्या. यातून, पुण्यात केवळ आमचेच वर्चस्व राहील, असा संदेश बंडू आंदेकरला द्यायचा होता. आंदेकर कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास असून, टोळीयुद्धात आतापर्यंत त्यांचे सहा सदस्य मारले गेले आहेत. २०२४ मध्ये सामोपचाराची भाषा करणाऱ्या बंडू आंदेकरने हा क्रूर बदला घेत, टोळीयुद्ध पुन्हा एकदा पेटवले आहे.






