पुणेकरांना मोठा दिलासा! इंधन टंचाई लवकरच मिटणार; ‘इतक्या’ दिवसांत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होणार सुरळीत

On: March 26, 2026 6:11 PM
Pune Fuel Shortage
---Advertisement---

Pune Fuel Shortage | राज्यात आणि विशेषतः पुणे शहरात इंधन टंचाईच्या चर्चांना वेग आला असताना या परिस्थितीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या परिस्थितीत काही सकारात्मक घडामोडी झाल्याने येत्या काही दिवसांत इंधन पुरवठा हळूहळू सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचे कोअर कमिटी मेंबर आणि भाजप प्रवक्ते अली दारूवाला यांनी माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय निर्णयामुळे दिलासा :

अलीकडील परिस्थितीत इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे परिस्थिती लवकर सुधारण्याची शक्यता वाढली आहे. यासंदर्भात ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचे कोअर कमिटी मेंबर आणि भाजप प्रवक्ते अली दारूवाला (Ali Daruwalla) यांनी सांगितले की इंधन पुरवठ्याशी संबंधित तीन महत्त्वाचे बदल घडले आहेत. (Pune Fuel Shortage)

यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे (Iran) सरकारने (Strait of Hormuz) मार्गातून भारतासह काही देशांच्या जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅसची वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास अनेक देशांच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतो. आता परवानगी मिळाल्याने भारताकडे येणाऱ्या इंधन वाहतुकीला चालना मिळेल आणि पुरवठा सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

Pune Fuel Shortage | CNG पाइपलाइन प्रकल्प पुन्हा सुरू :

दरम्यान, पुण्यातील सीएनजी पुरवठ्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. शहरातील (CNG) पाइपलाइन प्रकल्प काही प्रशासकीय अडचणींमुळे काही काळ थांबले होते. या अडथळ्यांमुळे कामाची गती मंदावली होती आणि त्यामुळे पुरवठा व्यवस्थेवरही परिणाम होत होता.

मात्र संबंधित विभागांकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काळात सीएनजी वितरण अधिक नियमित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या सकारात्मक घडामोडींमुळे पुढील 10 ते 15 दिवसांत पुण्यातील इंधन आणि सीएनजी पुरवठ्याची परिस्थिती पूर्ववत होऊ शकते.

News Title: Pune Fuel Shortage Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now