पुण्यातील ‘या’ भागात मद्यधुंद कारचालकाचा हैदोस! तब्बल ‘इतक्या’ वाहनांना दिली धडक

On: December 26, 2024 12:56 PM
Nashik Accident
---Advertisement---

Pune Crime l पुणे शहरात गेल्या काही दिवसांत मद्यधुंद वाहनचालकांमुळे घडलेल्या भीषण अपघातांच्या मालिकेत नवीन घटना समोर आली आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने पाचहून अधिक वाहनांना धडक दिली, यामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मद्यधुंद कारचालकाने पाचपेक्षा अधिक वाहनांना दिली धडक :

गेल्या दिवसांमध्ये पुण्यात मद्यधुंद वाहनचालकांच्या अपघातांची घटना वाढत चालल्या आहेत. अशातच 24 डिसेंबरला घडलेल्या या घटनेत, दीप बंगला चौकातील एका रस्त्यावर मद्यधुंद कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली. यानंतर, तो कारचालक पळून जात असताना त्याने आणखी अनेक वाहनांना धडक दिली. मात्र या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कारचालकाला दीप बंगला चौकातून अटक केली. या घटनेतील कारचालकाचे नाव दयानंद केदारी असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून वाहनही जप्त केले आहे.

Pune Crime l वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती :

चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी या घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या प्रकरणात कारचालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.”

तसेच या घटनेतील कारचालक दयानंद केदारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास देखील चतुर्श्रुंगी पोलीस करणार आहेत.

News Title : pune drunk driver accident News

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांनो ‘या’ दिवशी PM किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार?

बीडचं वातावरण तापणार! वाल्मिक कराडसह 4 बड्या नेत्यांची नावे समोर

अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

आज ‘या’ राशींना मेहनतीचे फळ मिळणार? धनलाभ होणार

हे कसलं प्रेम!, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तरूणाचं भयंकर कृत्य

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now