Pune Drunk and Drive Case | पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस आणि न्यायालय कडक पावले उचलताना दिसत आहेत. दारूच्या नशेत गाडी चालवण्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये शिवाजीनगर (Shivajinagar) येथील मोटार वाहन न्यायालयाने दोन तरुणांना कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे बेदरकार चालकांना स्पष्ट संदेश मिळाला असून, वाहतुकीतील शिस्त पाळण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. (Pune Drunk and Drive Case)
रोहित वर्माला कैद आणि दंड :
पहिल्या प्रकरणात, पिंपळे गुरव येथील रहिवासी 29 वर्षीय रोहित शैलेंद्र वर्मा (Rohit Varma) याला दोषी ठरवण्यात आलं. न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी त्याला 15 दिवसांची साधी कैद आणि ₹12,000 दंड अशी शिक्षा सुनावली. वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 185 आणि 3/181 अंतर्गत 4979/2024 हा गुन्हा दाखल केला होता.
दुसऱ्या प्रकरणात, नांदेड सिटी येथील 31 वर्षीय राजकुमार मांगीणी (rajkumar Mangini) कुलाल यालाही न्यायालयाने दोषी ठरवलं. त्याला देखील 15 दिवसांची साधी कैद आणि ₹10,000 दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणातही मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 आणि 185 अंतर्गत 01/2025 गुन्हा नोंदवला गेला होता.
Pune Drunk and Drive Case | पुण्यात वाढते ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चे गुन्हे :
वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव (Himmat Jadhav) यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात गेल्या काही वर्षांत ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाली आहे.
2020: 2,017 प्रकरणे
2021: 69 प्रकरणे
2022: 37 प्रकरणे
2023: 562 प्रकरणे
2024: 5,293 प्रकरणे
2025 (आतापर्यंत): 3,948 प्रकरणे
ही आकडेवारी पाहता, दारू पिऊन गाडी चालवण्याची प्रवृत्ती किती गंभीर पातळीवर वाढली आहे हे स्पष्ट होतं.
पोलिस आणि न्यायालयाची कडक भूमिका :
सरकारी वकील वर्षा राणी जाधव यांनी या दोन्ही प्रकरणांत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. तर, पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला आणि पीएसआय विकास पाटील यांनी संपूर्ण कार्यवाहीचं पर्यवेक्षण केलं. (Drunk and Drive Punishment)
न्यायालयाने दिलेल्या कठोर शिक्षेमुळे शहरातील बेशिस्त वाहनचालकांमध्ये नक्कीच वचक बसेल, अशी अपेक्षा आहे.






