Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पसार झालेल्या घायवळविरुद्ध आता आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड वापरल्याचा प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आला असून, कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्याच्यावर 6 गुन्ह्यांची नोंद होती; आता त्याचा गुन्हेगारी घडा वाढला आहे.
प्रकरणाची सविस्तर माहिती:
तपासात समोर आले की, 2020 पासून नीलेशने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड वापरले आहे. या प्रकरणात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि टेलीकम्युनिकेशन ॲक्ट 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. (Nilesh Ghaiwal News)
तसेच घायवळ युरोपात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत ब्लू कॉर्नर नोटीस (Blur corner notice) बजावली आहे. दरम्यान, कोथरूडमधील घायवळच्या घरावर छापा टाकून दोन काडतुसे, चार पुंगळ्या आणि सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले गेले. याशिवाय घायवळ आणि त्याच्या भावासह सात जणांविरुद्ध नव्या इमारतीतील दहा सदनिका बळकावल्याचा प्रकरणही नोंदवण्यात आले आहे. (Ghaiwal home raid)
Nilesh Ghaiwal | आंतरराष्ट्रीय तपास सुरु :
घायवळचा मुलगा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे पोलिस त्याच्या परदेशातील हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. तपास आता स्थानिक गुन्ह्यांपुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असून, त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा उघडकीस आणण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरु आहेत.
तसेच पासपोर्ट मिळवताना निलेशने आपले नाव ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असा बदल करून बनावट कागदपत्रे तयार केली होती. यामुळे अहिल्यानगर विभागातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.






