निलेश घायवळनंतर थेट ‘टिपू पठाण’ टोळीवर कारवाई; पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना दणका!

On: October 9, 2025 5:08 PM
Tipu sultan gang
---Advertisement---

Pune Crime News | पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते प्राबल्य मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी आता त्यांच्या आर्थिक मुळांवर घाव घालण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम आंदेकर टोळीचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करून मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आता, पुणे शहरातील हडपसर भागातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर (Tipu Pathan Gang) पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टिपू पठाण टोळीवर कठोर कारवाई :

बनावट दस्तऐवज (fake documents) तयार करून नागरिकांच्या मालमत्तांवर टिपू पठाण टोळीने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. तसेच त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. या टोळीवर काळेपडळ पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. मुख्य संशयित रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याचे साथीदार सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख आणि मुनीर शेख यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. गुन्हे शाखा (Crime Branch) या खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांची कसून चौकशी करत आहे.

या टोळीने हडपसर परिसरातील ११ गुंठे जागेची खोटी कागदपत्रे बनवून जागा बळकावली आणि त्यावर बेकायदेशीर बांधकाम उभे केले होते. महापालिकेच्या पथकामार्फत ही अनधिकृत बांधकामे युद्धपातळीवर पाडली जात आहेत. घरात दोन नोटरीकृत साठेखत देखील मिळाले असून, त्यांची सत्यता तपासली जात आहे.

Pune Crime News | महागड्या वस्तू जप्त :

पोलिसांनी आरोपींच्या घरांवर छापा टाकला असता, आरोपींच्या घरात एसी (AC), टीव्ही (TV), फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या सुमारे ४ ते ५ लाख रुपयांच्या महागड्या वस्तू आढळल्या. मात्र, कुटुंबीय या वस्तूंच्या खरेदीची योग्य बिले सादर करू शकले नाहीत. टिपू पठाण याच्या नावावर असलेली लाखो रुपये किमतीची इनोव्हा फोर व्हीलर कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार टोयोटाच्या वाघोली येथील शोरूममध्ये सर्व्हिसिंगसाठी ठेवलेली होती.

या कारवाईमुळे टोळ्यांच्या आर्थिक मुळांवर घाव घालून, त्यांचे गुन्हेगारी साम्राज्य उध्वस्त करण्याच्या पुणे पोलिसांच्या धोरणाला यश मिळाल्याचे दिसत आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

News Title :- Pune Crime News Pune Police Deliver Major Blow to Tipu Pathan Gang in Hadapsar

Join WhatsApp Group

Join Now