Firing in Kothrud | पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाच्या घटनांनी डोके वर काढले आहे. नुकतीच आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरवर (Ayush Komkar) झालेल्या भीषण हल्ल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, मध्यरात्री कोथरूड परिसरात घायवळ टोळीने भररस्त्यावर गोळीबार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nilesh Ghaywal Gang)
गाडीला साईड न दिल्याचा वाद आणि फायरींग :
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात ही घटना घडली. एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडांना गाडीला साईड न दिल्याने वाद उफाळून आला.
त्यानंतर टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत (Ganesh Raut) आणि मयुर कुंभारे (Mayur Kumbhare) या गुंडांनी कारमधील प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार केला. आरोपींपैकी मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या, ज्यापैकी एक गोळी मानेला आणि एक मांडीला लागल्याने प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाला आहे.
Firing in Kothrud | आंदेकर टोळीच्या गोळीबारानंतर नवा धक्का :
काही दिवसांपूर्वीच आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी आयुष कोमकरवर गोळीबार करून त्याची निर्दय हत्या केली होती. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्याने हा सूड घेतला गेला होता. (Nilesh Ghaywal Gang)
आता पुन्हा घायवळ टोळीच्या या प्रकारामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.






