Pune Crime | काही दिवसांपूर्वीच पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. अशात पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न करण्यात येत आहेत. बाणेर परिसरातील टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणाला आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करून लुटल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. (Pune Crime)
तरुण आणि तरुणीला मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा पुणे चर्चेत आलं आहे. अबिनियू चवांग आणि त्याची मैत्रीण चिंगमलाई पामेई अशी नावे या व्यक्तींची आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
बाणेर टेकडीवर पुन्हा लूट
अबिनियू चवांग आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई दोघेही बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी 18 ते 20 वयोगटातील चार जणांच्या टोळक्याने त्या दोघांना अडवून त्यांना मारहाण केली. इतकंच नाही तर, चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार देखील करण्यात आला. मारहाण करून त्यांच्याकडील सर्व साहित्य काढून घेत चार तरुण पसार झाले.
या सर्व प्रकरणानंतर रात्री उशिरा या दोघांनीही चतुशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच बोपदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या दोघांनाही अशाच प्रकारे चाकूचा धाक दाखवत मौल्यवान वस्तू घेऊन तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. (Pune Crime)
बोपदेव घाटातील घटना ताजी असतानाच आणखी एक घटना
बोपदेव घाटातील धक्कादायक घटनेमधील दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील तब्बल 40 गावे, वाड्या, वस्तींवरील अशा मिळून 450 नागरिकांची चौकशी केली होती. तसेच, पुणे जिल्ह्यातील घाट, टेकड्यांच्या परिसरात लूटमार करणारे, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. असं असताना पुन्हा एकदा बाणेर टेकडीवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune Crime)
News Title – Pune Crime Loot on Baner Hill
महत्त्वाच्या बातम्या-
थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार!
भाजपसह मनसेला मोठं खिंडार, माजी आमदारासह बड्या नेत्याचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश
विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला धक्का, ‘या’ विद्यमान आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश
आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार; विधीमंडळात आज शपथविधी
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जणांची नावे ठरली; पाहा कुणाला लागली लॉटरी?






