Pune Crime Firing | पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कोथरुड परिसरात पुन्हा एकदा भररस्त्यावर गोळीबार झाला. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गाडीला साईड न दिल्याच्या वादातून घायवळ (Ghaywal Gang) टोळीतील गुंडांनी प्रकाश धुमाळ (Prakash Dhumal) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या :
प्रकाश धुमाळ (Prakash Dhumal) या ३६ वर्षीय व्यक्तीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या. रक्तस्त्राव इतका प्रचंड होता की परिसरात रक्ताचे ठसे पडले होते. जीव वाचवण्यासाठी धुमाळ एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून लपले. त्या अवस्थेत सचिन गोपाळघरे नावाच्या स्थानिक नागरिकाने त्यांना पाणी दिलं आणि मदत केली.
ही घटना कोथरुड पोलिस स्टेशनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर घडली. तरीही पोलीस घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. इतक्या जवळ असलेल्या ठिकाणी पोलीस वेळेत पोहोचले नाहीत, हा मुद्दा गंभीर मानला जातोय.
Pune Crime Firing | आरोपींपैकी दोघे अटकेत, इतर फरार :
गोळीबाराचा मुख्य आरोपी मयुर कुंभारे असून त्याने तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये प्रकाश धुमाळ (Prakash Dhumal) गंभीर जखमी झाले. त्याच्यासह आनंद चांडलेकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र घायवळ टोळीतील इतर साथीदार अजूनही फरार आहेत. आरोपी मुसा शेख, रोहित आखाड आणि गणेश राऊत यांचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रकाश धुमाळ (Prakash Dhumal) यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते मित्रांसोबत उभे असताना दुचाकीला साईड न दिल्याने हा वाद पेटला आणि गुंडांनी गोळीबार केला. एका निष्पाप व्यक्तीवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






