Pune Sambhajinagar Highway | पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास सध्या तब्बल आठ ते नऊ तासांचा आहे. मात्र, लवकरच हा प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमएसआयडीसी)च्या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पामुळे हा बदल शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासच नाही तर वाहतुकीची व्यवस्था आणि आर्थिक दळणवळण यांमध्येही मोठा बदल घडणार आहे. (Pune Sambhajinagar Highway)
या नव्या महामार्गाच्या उभारणीमुळे पुणे ते संभाजीनगरदरम्यान प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या असलेली वाहनांची कोंडी, विलंब आणि प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील उद्योग, पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
तीन टप्प्यांत पूर्ण होणार महामार्ग प्रकल्प :
या महामार्ग प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-शिरूर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल. दुसऱ्या टप्प्यात शिरूर ते संभाजीनगरपर्यंत ग्रीनफिल्ड महामार्ग तयार केला जाणार आहे. हा भाग अत्याधुनिक पद्धतीने सहा-पदरी बनवला जाईल, ज्यात महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारे बायपास रस्ते तयार होणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात शिरूर ते संभाजीनगरपर्यंतचा सहा-पदरी महामार्ग तयार होईल. या भागात आधुनिक डिझाइन, उच्च सुरक्षा मानके आणि जलद वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह मालवाहतुकीसाठी हा महामार्ग मोठा दिलासा ठरेल.
Pune Sambhajinagar Highway | मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार :
या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात नवे दालन उघडणार आहे. बीड, छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या जिल्ह्यांत गुंतवणुकीसाठी नव्या संधी निर्माण होतील. या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, अंदाजे २२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (Pune Sambhajinagar Highway)
महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे–मराठवाडा–विदर्भ हा पट्टा एकाच साखळीत येईल. यामुळे राज्यातील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि आर्थिक विकासाचा वेग वाढेल. आता ८ ते ९ तासांचा खडतर प्रवास केवळ ३ तासांत साध्य होणार असून, हा प्रकल्प राज्याच्या पायाभूत विकासासाठी खरा ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.






