धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर

On: September 30, 2024 3:02 PM
Nashik Accident
---Advertisement---

Pune Bus Accident l आजकाल राज्यात रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. अशातच आज पुण्याच्या भोरमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे जाणाऱ्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी एका वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा धक्कादायक अपघात झाल्याची माहिती आहे.

एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका वळणावर एसटी बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट शेतात घुसल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 42 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत तर 3 नागरिक गंभीर जखमी आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आणि दुखापग्रस्त नागरिकांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच या घटनेतील काही नागरिकांवर भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या अपघातातील गंभीर जखमी असणाऱ्या तिघांना उपचारासाठी भोरमधील खासगी रुग्णालयात देखील दाखलं करण्यात आलं आहे.

Pune Bus Accident l या घटनेचा पोलीस तपास करत आहेत ? :

या अपघातामधील या गंभीर जखमींना आयसीयू कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. तसेच या अपघातातील रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

मात्र एसटी अपघाताच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

News Title : Pune bus accident in bhor

महत्वाच्या बातम्या –

पवारांची बारामती हादरली! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये चाकू खुपसून विद्यार्थ्याचा खून

अजितदादांची स्मार्ट खेळी! फोनद्वारे केला पहिला उमेदवार जाहीर

सर्वात मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?

भाजपला धक्क्यावर धक्के, आणखी एक बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

यंदाच्या शारदीय नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत 9 रंग; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now