पुणेकरांनो ATM मधून पैसे काढताय? रात्रीच्या वेळी घडलेली ‘ही’ भयंकर घटना वाचून अंगावर काटा येईल

On: February 4, 2026 1:56 PM
Pune ATM Robbery
---Advertisement---

Pune ATM Robbery | पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात एटीएममधून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या एका तरुणावर हल्ला करून लुटमार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यवर्ती भागात आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. एटीएम परिसरात सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनीही दिला आहे.

मारहाण करून २८ हजारांची रोकड लंपास :

ही घटना १ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. कसबा पेठ परिसरात राहणारा ३२ वर्षीय तरुण आपल्या मित्रासोबत शिवाजीनगरमधील श्री म्हसोबा मंदिराजवळील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे काढून बाहेर पडताच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले.

कोणतीही चौकशी न करता चोरट्यांनी तरुण आणि त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढवला. या झटापटीत तरुण भांबावून गेला आणि त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्याच्या खिशातील २८ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर ते दोघे दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune ATM Robbery | पोलिस तपास सुरू, CCTV फुटेजची पाहणी :

या प्रकरणी पीडित तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लूटमार आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. (Pune ATM Robbery)

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आरोपी कोणत्या दिशेने पळाले याचा शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एटीएममध्ये पैसे काढताना अधिक सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

News Title: Pune ATM Robbery: Youth Attacked and Looted in Shivajinagar, Police Probe On

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now