मन सुन्न करणारी घटना, शेतात काम करताना लेकीचा ओरडण्याचा आवाज आला अन्…

On: January 21, 2025 6:02 PM
Pune Accident Kills 3 Year Old Girl in Pune
---Advertisement---

Pune Accident | पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यातील गणेगाव दुमाला (Ganegaon Dumala) परिसरातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिकअप (Pickup) गाडीजवळ खेळत असताना, गाडीचे चाक अंगावरून गेल्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Pune Accident)

नेहा दीपक पवार (Neha Deepak Pawar) असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव असून सुनील दत्तात्रेय खळदकर (Sunil Dattatray Khaladkar) असे पिकअप चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दीपक सुरेश पवार (Deepak Suresh Pawar) यांनी फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पवार हे दौंड (Daund) तालुक्यातील नानगाव (Nangaon) येथील एका गुऱ्हाळावर (Gurhal) कामासाठी सहकुटुंब वास्तव्यास आहेत. ते ऊसतोडीचे काम करतात. रविवारी सकाळी ते आपल्या कुटुंबासह पिकअपमधून ऊस तोडण्यासाठी गणेगाव दुमाला येथे आले होते.

पिकअप चालकाने गाडी शेतातील कच्च्या रस्त्यावर लावली आणि गाडीला चावी तशीच ठेवून तो घरी निघून गेला. दीपक पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत शेतात ऊस तोडत होते. नेहा (Neha) त्यावेळी पिकअपजवळ खेळत होती. काही वेळाने तिचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. (Pune Accident)

चिमुकलीचा दुर्दैवी अंत

नेहाचा (Neha) आवाज ऐकून वडील दीपक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, नेहाच्या अंगावरून पिकअप गाडीचे चाक गेले होते. नेहा बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, नेमके चाक अंगावरून कसे गेले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Pune Accident)

Title : Pune Accident Kills 3 Year Old Girl in Pune

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now