किरीट सोमय्या संकटात; नव्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ

On: April 21, 2025 4:58 PM
---Advertisement---

Kirit Somaiya | अलिबाग येथील निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांच्या मृत्यूला आत्महत्या नव्हे, तर हत्या ठरवून भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आशिष करंदीकर (Ashish Karandikar) यांनी आज मुंबईत (Mumbai) मंत्रालयाबाहेर (Mantralaya) आंदोलन केले. हाती फलक घेऊन त्यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलकाचे आरोप आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह

आशिष करंदीकर यांनी आरोप केला आहे की, प्राध्यापक अविनाश ओक यांची ५ मार्च रोजी झालेली घटना आत्महत्या नसून, किरीट सोमय्या त्यासाठी जबाबदार आहेत. आपण या संदर्भात वारंवार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही, सोमय्या हे भाजपचे नेते असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा दावा करंदीकर यांनी केला. त्यांनी सोमय्यांविरुद्ध खून, खंडणी, अपहरण असे गुन्हे दाखल केले असले, तरी पोलीस त्यांच्या दबावाखाली हे प्रकरण ‘सिव्हील मॅटर’ म्हणून हाताळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

करंदीकर यांनी पुढे म्हटले की, हे दुसरे बीड (Beed) प्रकरण असून, सहा महिने न्यायासाठी प्रयत्न करूनही दाद न मिळाल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेऊन संविधानाने दिलेला बोलण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात असल्याचे ते म्हणाले.

प्रा. अविनाश ओक मृत्यू प्रकरण

अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे (J.S.M. College) निवृत्त राज्यशास्त्र प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे (Jan Shikshan Sansthan Raigad) माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी ५ मार्च रोजी पेण (Pen) रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आपले जीवन संपवले होते. या घटनेने रायगड (Raigad) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर किरीट सोमय्या, जे प्रा. ओक यांचे चुलत मेहुणे आहेत, तातडीने पेण येथे दाखल झाले होते.

प्रा. ओक हे मूळचे माणगावचे (Mangaon) होते व त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. ते अलिबाग येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठे कार्य होते. त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या (Kamal Nagari Sanstha) संचालिका आहेत. त्यांच्या मृत्यू प्रकरणाला आता करंदीकर यांच्या आंदोलनामुळे वेगळे वळण लागले आहे.

Title : Protest Blames Kirit Somaiya For Professor Oak’s Death

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now