Priyansh Arya l पंजाब किंग्जचा युवा सलामीवीर प्रियांश आर्य याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 42 चेंडूत 103 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सतत विकेट पडत असताना एकहाती सामना खेचणाऱ्या प्रियांशच्या खेळीमुळे मालकीण प्रीती झिंटा भारावून गेली. सामन्यानंतर प्रीतीने स्वतः मैदानात उतरून प्रियांशचं अभिनंदन केलं आणि एक खास भेटवस्तू देऊन त्याला सन्मानित केलं.
या खास क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रीती झिंटा, प्रियांशला मिठी मारताना आणि छोटंसं गिफ्ट देताना दिसतेय. धोनीसारख्या दिग्गजांपुढे शतक झळकावणाऱ्या प्रियांशसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.
संकटातही झळकलं शतक; संघाची विजयाकडे वाटचाल :
पंजाब किंग्जने 83 धावांत आघाडीचे 5 फलंदाज गमावले होते. प्रभसिमरन, श्रेयस अय्यर, स्टोइनिस, नेहल वधेरा आणि मॅक्सवेल हे सारे स्वस्तात बाद झाले. मात्र दुसऱ्या टोकाला प्रियांशने संयम आणि आक्रमकतेचं उत्तम मिश्रण दाखवत 9 षटकार आणि 7 चौकारांसह तुफानी शतक ठोकलं.
त्याला शशांक सिंग (52) आणि मार्को जानसेन (34) यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं. सामन्याच्या शेवटी पंजाबने 219 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल CSK फक्त 201 धावाच करू शकली. लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट घेत सामन्यावर शिक्कामोर्तब केलं.
Preity Zinta shares heartfelt congrats with Priyansh Arya for his stellar century after the match! ????????#preityzinta #pbks #punjabkings #priyansharya #ipl2025 #cricket #CSKvsPBKS pic.twitter.com/DRfi0cvKqv
— Khushal Badhe (@khushalbadhe11) April 9, 2025
Priyansh Arya l नेहल वधेराचा सल्ला ठरला टर्निंग पॉइंट :
सामन्यानंतर प्रियांश आर्यने सांगितलं की, सतत विकेट पडत असताना तो खेळ स्थिर ठेवण्याचा विचार करत होता. पण नेहल वधेराने त्याला म्हणलं – “तू तुझ्या पद्धतीने खेळ” आणि त्या शब्दांनीच आत्मविश्वास मिळाल्याचं प्रियांश म्हणाला.
त्याच्या या खेळीने फक्त सामना जिंकून दिला नाही, तर संपूर्ण IPLमध्ये त्याचं नाव उजळून टाकलं. पंजाब किंग्जचा हा चौथ्या सामन्यातील तिसरा विजय असून ते आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.






