“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या

On: July 20, 2024 6:34 PM
Priyanka Gandhi
---Advertisement---

Priyanka Gandhi | देशात अगोदर नीट परीक्षेवरून प्रचंड गोंधळ उडाला होता. आता तर, UPSC सारख्या परीक्षेतही हेराफेरी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशात सध्या UPSC प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. त्यांच्याविरोधात दिल्ली क्राइम ब्रँचमध्ये FIR देखील दाखल आहे.

देशात अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या UPSC नागरी सेवा परीक्षेत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात या प्रकरणी मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

पूजा खेडकर यांच्यामुळे यूपीएससीची प्रमाणपत्र प्रणाली आणि त्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.याच प्रकरणी आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

यूपीएससी ही देशातील सर्वात प्रसिद्ध परीक्षा आहे आणि त्यातून बाहेर पडणारे लोक हे शासन व्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे स्तंभ आहेत. देशातील कोट्यवधी लोकांचा विश्वास आणि आपला दैनंदिन कारभार या संस्थेच्या व्यावसायिक व्यवस्थेशी जोडलेला आहे. डोळ्यात खूप स्वप्ने आणि अंत:करणात समर्पण ठेवून तरुण या परीक्षेची किती मेहनत घेतात हे मी स्वतः पाहिले आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

युपीएससी परीक्षेतील घोटाळ्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे, कारण या प्रक्रियेतील एकही बोगसगिरी अनेक प्रश्न उपस्थित करते. लाखो युवकांचे स्वप्न आणि त्यांच्या विश्वासावर मोठा आघात करते. त्यामुळेच, जनता आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी देखील प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केली.

तसेच पुढे त्या म्हणाल्या की, राजकीय हस्तक्षेपाने या उच्च पदावर नियुक्त झालेले लोकच यास जबाबदार आहेत? जर असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी, असाही सवाल प्रियंका गांधींनी विचारला आहे. तसेच, नकली प्रमाणपत्रामुळे एससी, एसटी, ओबीसी, विकलांग व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना मिळणाऱ्या संधीवर बाधा आणतो. त्यामुळे, हे प्रमाणपत्र तपासणी करणारी एखादी संस्था विकसित केली जाईल का?,असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

पूजा खेडकर यांच्यावर नेमके आरोप काय?

दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावर बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे, वयाच्या मर्यादेत फेरफार करणे, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत मर्यादेपेक्षा जास्त वेळा उपस्थित राहण्यासाठी ओळख बदलणे असे आरोप करण्यात आले आहेत.

News Title :  Priyanka Gandhi On Modi Govt Over Pooja Khedkar  

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान

विधानसभेपूर्वीच अजितदादांना धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, चांदीचाही मोठा दिलासा

शनीदेवाच्या कुपेने ‘या’ 3 राशींना मोठा धनलाभ होणार!

Join WhatsApp Group

Join Now