Priyanka Chopra | बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ने आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र, तिच्या चित्रपटांमधील काही सीन विशेष चर्चेत राहिले आहेत. असाच एक किस्सा ‘7 खून माफ’ (7 Khoon Maaf) या चित्रपटातील आहे, जिथे तिने अभिनेता अनू कपूर (Annu Kapoor) सोबत एका सीनमध्ये किसिंग करण्यास नकार दिला होता.
अनू कपूरने काय खुलासा केला?
‘7 खून माफ’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रियंका आणि अनू कपूर यांचा एक बेडरूम सीन होता. दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांनी त्यात किसिंग सीन देखील ठेवला होता. मात्र, प्रियंका त्यास तयार नव्हती आणि तिने दिग्दर्शकाला तो सीन काढून टाकण्याची विनंती केली.
या संदर्भात अनू कपूर यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जर मी हिरो असतो, तर प्रियंकाला (Priyanka Chopra) कोणतीही अडचण झाली नसती. तिला हिरोसोबत किसिंग सीन करण्यात काहीच अडचण नाही, पण माझ्यासोबत मात्र तिला अडचण वाटली. माझ्या चेहऱ्यावर हीरोसारखं व्यक्तिमत्त्व नाही, म्हणून तिने हा सीन करण्यास नकार दिला.”
विशाल भारद्वाज यांचा निर्णय-
प्रियंका चोप्राने या सीनसाठी नकार दिल्यानंतर विशाल भारद्वाज यांनी तो सीन काढून टाकण्यास नकार दिला. परिणामी, अनू कपूर यांचा एकट्याचा शॉट घेण्यात आला, ज्यासाठी त्यांना प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठी प्रशंसा मिळाली.
शाहिदसोबत किसिंग सीनसाठी साशंक-
विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेल्या आणखी एका चित्रपटात, ‘कमीने’ (Kaminey) मध्ये प्रियंका चोप्राने शाहिद कपूर (Shahid Kapoor) सोबत काम केले होते. या चित्रपटातही एक किसिंग सीन होता, जो अचानक शूटिंगच्या वेळी प्रियंकाला सांगण्यात आला. त्यामुळे तिला थोडा संकोच वाटला.
पण शाहिद कपूरने तिला कम्फर्टेबल वाटेल याची काळजी घेतली, आणि विशाल भारद्वाज यांनीही सांगितले की, हा सीन चित्रपटासाठी महत्त्वाचा आहे. अखेर प्रियंका या सीनसाठी तयार झाली.
प्रियंका चोप्राच्या निर्णयावर चर्चेचा विषय
प्रियंका चोप्राने अनू कपूरसोबत किसिंग सीन नाकारला पण शाहिदसोबत तो केला, यावर बऱ्याच चर्चा झाल्या. या प्रकरणावर अनू कपूर यांनी दिलेलं वक्तव्य अजूनही चर्चेत असतं.






