Priya Bapat | मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने मालिका, नाटक आणि सिनेमांपासून ते वेब सीरिजपर्यंत (Web Series) आपल्या अभिनयाची (Acting) छाप उमटवली आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ‘रात जवां है’ ही हलकीफुलकी सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमधील ‘पौर्णिमा गायकवाड’ या भूमिकेसाठी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगचा सामना कसा केला, याचा अनुभव तिने नुकताच एका मुलाखतीत (Interview) सांगितला.
इंटिमेट सीन आणि व्हायरल क्लिप
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमध्ये प्रियाने एक पॉवरफुल राजकारणी साकारली आहे. पण, त्याचबरोबर ती एक लेस्बियनही (Lesbian) असल्याचे दाखवण्यात आले आहे. सीरिजच्या पहिल्याच सीझनमध्ये तिचा एका मुलीसोबतचा इंटिमेट सीन चित्रित करण्यात आला होता. हाच सीन असलेली एक क्लिप तुफान व्हायरल झाली आणि प्रियाला ()Priya Bapat ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
प्रियाला बसला धक्का; आई-वडिलांना केला फोन
‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने या प्रसंगाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. मी आणि एजाज मुलाखती देत होतो. अचानक फोन वाजू लागले. सगळे म्हणत होते की नको ओपन करु. मला त्या क्लिपला व्हायरल क्लिप म्हणून बघायचे नव्हते. कारण मला माहित होतं की मी शोमध्ये काय केलं आहे. रिलीजचा तो पहिलाच दिवस होता आणि तो व्हिडिओ बाहेर आला. आम्हाला प्रश्नच पडला की हे बाहेर कसं आलं. कारण आमच्या टीमने तर हे केलं नव्हतं. ही काही आमची प्रमोशनल स्ट्रेटेजी (Promotional Strategy) नव्हती.”
भावनिक उद्रेक आणि वडिलांचा पाठिंबा
“मला कळतच नव्हतं की लोक याबद्दल इतकं का बोलत आहेत. मी ऑनस्क्रीन पहिल्यांदाच इंटिमेट सीन दिला होता. मी खूप डिस्टर्ब झाले, रडले. आधी आई-बाबांना फोन केला. त्यांना सांगितलं की असा असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. २-३ दिवस तरी मी रडतच होते. पण तो सीन का केला, तर ती कथेची गरजच होती. लोक पूर्ण सीरिज का बघत नाहीयेत आणि छोट्या गोष्टींवरून ट्रोल करत आहेत. पण मला वडिलांनी खूप सपोर्ट केला. ‘हे तुझ्या कामाचा भाग आहे, तू केलंस, आता विसर,’ असे त्यांनी मला समजावले.”
या अनुभवातून प्रियाने (Priya Bapat) एक महत्त्वाची गोष्ट शिकली, ती म्हणजे, कलाकाराला ट्रोलिंगचा सामना करावाच लागतो. मात्र, अशावेळी खचून न जाता, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळवणे महत्त्वाचे असते.
Title: Priya Bapat Opens Up About Trolling After Intimate Scene in City of Dreams
महत्वाच्या बातम्या-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेपर्यंत मिळणार पैसे
सैफ अली खानच्या आधी ‘या’ अभिनेत्यांच्या घरीही झालीये घुसखोरी, नावं ऐकून धक्का बसेल
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!
NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!






