Premananda Maharaj | धार्मिक नगरी उज्जैनमध्ये बडनगर रोडवर श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी हिंदू महिलांना चार मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे नवीन वाद उफाळून (Premananda Maharaj) आला आहे.
कथा वाचनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थित लोकांना हिंदुस्तानला हिंदुस्तान म्हणून कायम ठेवण्याचं आवाहन करत महिला भक्तांना एक वादग्रस्त सल्ला दिला. “तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटेल. पण, हिंदू धर्माला धोका आहे. आता ती वेळ आलीय, जेव्हा तुम्हाला सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी क्षत्राणी बनावं लागेल.”, असं प्रेमानंद महाराज म्हणाले आहेत.
“..तर तिसऱ्या मुलांचा सांभाळ आम्ही करु”
“आज जरी आपण अल्पसंख्याक म्हणत असलो तरी, तो दिवस दूर नाही, जेव्हा कश्मीरप्रमाणे आपण अल्पसंख्याक बनून जाऊ.”,असंही प्रेमानंद महाराज म्हणाले आहेत. पुढे त्यांनी महिलांबाबत (Premananda Maharaj)विधान केलं.
” दुसऱ्या समाजाचे लोक 8-8 मुलं जन्माला घालत आहेत आणि आमच्या माता फिगर मेन्टेनच्या नादात अडकल्या आहेत. पण, हिंदुंनी 4 मुलं जन्माला घातली पहिजे. त्यांनी कमीत कमी 4-4 मुलांना जन्माला घातलं पाहिजे.”, असा सल्ला त्यांनी महिला भक्तांना दिला आहे.
“..अन्यथा हिंदुस्तानचा इंडोनेशिया होऊन जाईल”
इतकंच नाही तर पुढे त्यांनी म्हटलं की, तुम्ही जर 2 मुलांच टार्गेट ठेवलं असेल आणि तुम्ही जर 3 मुलं जन्माला घालत असाल, तर चिंता करण्याची गरज नाही. तिसऱ्या मुलांचा सांभाळ आम्ही करु, असं महामंडलेश्वर महाराज म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.
तसेच पुढे त्यांनी म्हटलं की, “तुम्ही आता जागे झाला नाहीत, तर हिंदुस्तानचा इंडोनेशिया बनायला वेळ लागणार नाही. अजूनही वेळ निघून गेलेली नाही. वेळीच जागे व्हा, अन्यथा हिंदुस्तानचा इंडोनेशिया होऊन जाईल.”, यावेळी त्यांनी अर्ध उत्तर प्रदेश हातातून निघून गेलय. तिथले 17 जिल्हे हिंदू धर्माचे राहिलेले नसल्याचं(Premananda Maharaj) सांगितलं.
News Title – premananda maharaj controversial statement on hindu women
महत्त्वाच्या बातम्या-
“घरातील एकटेपणा खायला उठतो, तो कमी करण्यासाठी मी..”; अभिनेत्री रेखा यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल
“माझी हात जोडून विनंती…”; महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video






