Premanand Maharaj | देशभरातील लाखो भक्तांच्या मनातील प्रश्न अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर “प्रेमानंद महाराज आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे” असा संदेश व्हायरल होत होता. या बातमीमुळे भक्तांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र आता महाराजांनी स्वतः समोर येऊन दिलेल्या व्हिडिओ संदेशामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं आहे. (Premanand Maharaj Health)
प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) हे संपूर्ण भारतभर त्यांच्या प्रवचनांमुळे आणि अध्यात्मिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत. विशेषतः तरुण पिढीला अध्यात्माकडे वळवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल आलेल्या बातम्या पाहून देशभरातील भक्त वर्गात काळजी आणि संभ्रमाचे वातावरण होते.
व्हिडिओतून दिला आरोग्याचा संदेश – “मी पूर्णपणे स्वस्थ आहे” :
प्रेमानंद महाराजांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये महाराज स्वतः भक्तांशी संवाद साधताना दिसतात. भक्त त्यांना सांगतात की, “काही लोकांनी तुम्ही रुग्णालयात आहात अशा अफवा पसरवल्या आहेत.” (Premanand Maharaj Latest Video)
Social Media पर फैल रहे झूठ के बारे में महाराज जी ने क्या कहा? pic.twitter.com/MrlPNbat0u
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) October 7, 2025
यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, “मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुमच्यासमोर बसलो आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मी एकांतात आहे.” या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या आरोग्याबाबत पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
या व्हिडिओमुळे महाराजांच्या चाहत्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक भक्तांनी सोशल मीडियावर “जय राधे राधे” म्हणत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.
Premanand Maharaj | “हा कलियुगाचा प्रभाव आहे” — प्रेमानंद महाराजांचा इशारा :
या व्हिडिओमध्ये महाराजांचा एक शिष्य सांगतो की, “लोक खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं मानू लागले आहेत.” त्यावर महाराज म्हणतात, “हा कलियुगाचा प्रभाव आहे. लोक कोणतीही गोष्ट पडताळणी न करता सत्य मानतात. त्यामुळे अशा अफवांपासून सावध राहणं आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “जर कोणी म्हणालं की एखादी व्यक्ती आजारी आहे, तर लोक लगेच विश्वास ठेवतात, पण एकदाही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशा लोकांच्या भ्रमात पडू नका.” या शब्दांनी महाराजांनी भक्तांना अफवांपासून सावध राहण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे.






