पंजाब किंग्जच्या पराभवानंतर प्रिती झिंटाच्या डोळ्यात अश्रू; चाहतेही नाराज

On: June 4, 2025 10:39 AM
Preity Zinta
---Advertisement---

Preity Zinta | आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला (PBKS) अवघ्या काही धावांनी पराभव पत्करावा लागला आणि या पराभवानंतर टीमची सहमालकीण अभिनेत्री प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) डोळ्यातील अश्रू सर्वांना भावूक करून गेले. प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावरची निराशा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओंमधून स्पष्टपणे दिसून आली आहे. आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जने एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही, आणि यंदा तशी संधी हातातून गेल्यामुळे प्रितीची भावना अनावर झाली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानंतर ती मैदानात पारंपरिक पोशाखात दिसली. सामना संपल्यानंतर ती शांतपणे मैदानावरून बाहेर पडताना दिसली, मात्र तिच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुःख स्पष्टपणे दिसत होते. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या ह्या भावनिक क्षणांवर आपली प्रतिक्रिया दिली असून, ती केवळ मालकीण नसून, तिच्या टीमसाठी खऱ्या अर्थाने ‘सपोर्ट सिस्टीम’ असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.

चाहत्यांचं भावनिक समर्थन :

सोशल मीडियावर एकाने लिहिलं, “हीसुद्धा १८ वर्षांपासून जिंकण्याची वाट पाहत होती… तिचे अश्रू खूप काही सांगून जातात.” तर दुसऱ्याने म्हटलं, “प्रितीने कधीही कोणाला ट्रोल केलं नाही. ती दरवर्षी टीमसोबत उभी राहते. आज तिच्याविषयीचा आदर आणखी वाढला आहे.” (Preity Zinta Viral Video)

एक जण म्हणतो, “जेव्हा कोणी कोहलीच्या निष्ठेबद्दल बोलतो, तेव्हा आम्ही प्रिती झिंटाच्या जिद्दीची आणि प्रेमाची आठवण करतो. ती १८ वर्षांपासून कायमस्वरूपी टीमसोबत आहे, आणि ती एक दिवस नक्की जिंकेल याची आम्हाला खात्री आहे.”

Preity Zinta | २०१४ची आठवण :

2014 मध्येही पंजाब किंग्जने अंतिम फेरी गाठली होती, पण त्या वेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही प्रिती झिंटाच्या अश्रूंनी चाहत्यांची मनं जिंकली होती.

2025 च्या फायनलनंतर हेच दृश्य पुन्हा एकदा घडले. तिच्या या निष्ठेमुळे आणि भावना व्यक्त करतानाच्या संयमामुळे प्रिती झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

News Title: Preity Zinta in Tears After Punjab Kings’ Loss in IPL 2025 Final, Fans Offer Emotional Support

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now