दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेसोबत नक्की काय घडलं?, कुटुंबियांनी सगळं सांगितलं

On: April 4, 2025 3:48 PM
tanisha bhise
---Advertisement---

Deenanath Mangeshkar Hospital | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप होत असून, तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या उपचारासाठी दहा लाख रुपये मागितल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

रुग्णालयावर उपचार नाकारण्याचा आरोप-

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना गंभीर अवस्थेत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्यापूर्वी दहा लाख रुपये भरण्याची अट घातली, असा गंभीर आरोप भिसे कुटुंबीयांनी केला आहे. आर्थिक अडचणीमुळे तातडीने पैसे न भरल्याने तनिषा यांना त्वरित उपचार मिळाले नाहीत, आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात सुशांत भिसे यांनी स्थानिक आमदारांचे सहकार्य घेत रुग्णालय प्रशासनाला उपचारासाठी विनंती केली होती. तरीही रुग्णालयाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, असा दावा केला जात आहे. रुग्णालयाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले असून, संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रसूतीपूर्व परिस्थिती आणि कुटुंबीयांचे अनुभव-

प्रियांका पाटील या सुशांत भिसे यांच्या भगिनी असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्या दिवसाचे घटनाक्रम उलगडून सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ९ वाजता तनिषा यांना रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बीपी जास्त असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांना तिसऱ्या मजल्यावरील असेसमेंट रुममध्ये हलवण्यात आले. तिथे दुसऱ्या डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून त्वरित सिझेरियनची तयारी सुरू केली होती. रुग्णाचे कपडेही बदलण्यात आले होते.

नंतर डॉक्टरांनी रक्तस्राव सुरु असल्याचे सांगून शस्त्रक्रिया तातडीने करण्याची गरज व्यक्त केली. मात्र त्याचवेळी दोन्ही बाळांना NICU मध्ये ठेवावे लागेल आणि त्यासाठी प्रत्येकी दहा लाखांचा खर्च येईल, असे सांगण्यात आले. आमच्या विनंतीनंतर त्यांनी कमीत कमी दहा लाख रुपये त्वरित भरण्याची अट ठेवली. अन्यथा ससून रुग्णालयात जावे, असे सांगण्यात आले. हे सर्व तनिषा यांच्या समोरच सांगण्यात आल्याने त्यांच्या मनावर जबरदस्त ताण आला. आधीच रक्तस्राव आणि उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या तनिषा यांना हा आर्थिक दडपणाचा धक्का सहन झाला नाही आणि त्या कोसळल्या.

News Title : Pregnant Woman Dies in deenanath mangeshkar hospital

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now