“महिला डॉक्टरने त्याला प्रपोज…”, आरोपी प्रशांतच्या बहिणीचा गौप्यस्फोट

On: October 25, 2025 4:01 PM
Dr. Sampada Munde
---Advertisement---

Prashant Bankar | फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. पीएसआय गोपाल बदने हा अद्याप फरार असताना, प्रशांत बनकरला(Prashant Bankar) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता प्रशांतच्या बहिणीने केलेल्या खुलाशामुळे चौकशीचं स्वरूपच बदलण्याची शक्यता आहे. तिच्या मते, महिला डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केलं होतं, पण त्याने नम्रपणे नकार दिला होता.

प्रकरणातील नवा गौप्यस्फोट:

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पोलिस अधिकारी गोपाल बदनेवर बलात्काराचा आणि प्रशांत बनकरवर(Prashant Bankar) मानसिक तसेच शारीरिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेतलं असून, त्याचे वडील आणि भाऊ यांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात थांबवण्यात आलं होतं. मात्र, प्रशांतच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, त्याला अटक करण्यात आली नाही, तर तो स्वतःहून घरात हजर झाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

प्रशांतच्या(Prashant Bankar) बहिणीच्या मते, त्या महिला डॉक्टर त्यांच्या घरी राहात असताना त्यांच्याशी खूपच जवळच्या झाल्या होत्या. “ती आमच्याकडे रहायला होती. आमच्यात खूप मैत्री होती. ती तिचं सर्व काही मला सांगायची,” असं तिने सांगितलं. “मी माझ्या कामामुळे सारखी तणावाखाली असते” असं ती नेहमी बोलायची आणि आपल्या नोकरीबाबत ती समाधानी नव्हती, असंही बहिणीने नमूद केलं.

Prashant Bankar | डॉक्टरचा प्रशांतला प्रपोजल:

प्रशांत बनकरच्या(Prashant Bankar) बहिणीने सांगितलं की, तिचा भाऊ काही दिवसांसाठी घरी आला असताना डॉक्टर त्याच्याशी घरातील व्यक्तीप्रमाणे वागत असत. त्यांच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं होतं. पण पुण्यात असताना डॉक्टरने प्रशांतला मेसेजद्वारे प्रपोज केलं होतं. त्यावर प्रशांतने तिला “नाही मॅडम, मी तुम्हाला घरच्यांसारखं मानतो, तुम्ही मला दादा म्हणता,” असं म्हणत स्पष्ट नकार दिला होता. या घटनेनंतर डॉक्टर काहीशी व्यथित झाल्या होत्या, असा खुलासा त्याच्या बहिणीने केला आहे.

या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, पोलिस या नव्या माहितीच्या आधारे चौकशीचा दिशादेखील बदलण्याची शक्यता आहे. सध्या पीएसआय गोपाल बदने फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याच्यामुळेच या प्रकरणात मुख्य भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं कारण काय?

प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाचं नाव य या प्रकरणात चुकीने गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं की, प्रशांत निर्दोष असून, तो कोणत्याही प्रकारे डॉक्टरला त्रास देत नव्हता. आणि जर तो त्रास देत असेल तर तिने, तिचे आई-वडिल लक्ष्मीपुजनाच्या वेळी आले अस्ताना त्यांना हे का नाही सांगितलं?

डॉक्टरच्या आत्महत्येमागे कामाच्या ताणतणावासह वैयक्तिक कारणंही असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व घडामोडींमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. डॉक्टरच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, आणि तिच्या आयुष्यातील कोणत्या घटनेने हा शेवट घडवला, याचा तपास आता पोलिस अधिक तपशीलवारपणे करणार आहेत. सर्वांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील चौकशी आणि पीएसआय गोपाल बदनेच्या अटकेकडे लागले आहे.

News Title- prashant bankar sister on dr. sampada munde

Join WhatsApp Group

Join Now