Prashant Bankar | फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्याला हादरवले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या प्रशांत बनकरला(Prashant Bankar) पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे, तर बलात्काराचा आरोप असलेला पीएसआय गोपाल बदने अजूनही फरार आहे. डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तळहातावर लिहिलेल्या चिठ्ठीत दोघांची नावे नमूद केल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
गोपाल बदनेचा शोध सुरू:
या प्रकरणात आरोपी पीएसआय गोपाल बदने हा मुळचा परळी येथील असल्याचे समोर आले आहे. आत्महत्येनंतर त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर परिसरात आढळले, त्यानंतर त्याचा संपर्क तुटला आहे. पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. सातारा पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गोपाल बदनेचा लवकरच शोध लागेल आणि तो कायद्याच्या कचाट्यात येईल,” अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोपाल बदनेवर बलात्काराचा गंभीर आरोप असून, आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव स्पष्टपणे नमूद असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षेवर आणि पोलिस यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Prashant Bankar | प्रशांत बनकरच्या(Prashant Bankar) आईची प्रतिक्रिया:
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या प्रशांत बनकरच्या आई-वडिलांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. “आमचा मुलगा पुण्यात कामाला असतो. तो फक्त दिवाळीसाठी घरी आला होता. आमचा मुलगा असं काही करणार नाही,” असे बनकरच्या आईने सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, “त्या मॅडमनी आमच्या मुलाचं नाव मुद्दाम लिहिलं. त्यांच्यावर अन्याय झाला.” प्रशांत बनकरच्या(Prashant Bankar) वडिलांनी देखील भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी त्या मॅडमना माझ्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तिने कोणाच्या दबावाखाली हे पाऊल उचललं का? हे शासनाने पाहायला हवं.” त्यांनी समाजमाध्यमांशी बोलताना शासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली. घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वाद पेटला आहे. पोलिस विभाग, आरोग्य यंत्रणा आणि राजकारण्यांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत.
राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणातील पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे.






