प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांकडून खळबळजनक खुलासा!

On: October 25, 2025 11:53 AM
prashant bankar
---Advertisement---

Prashant Bankar | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या कुटुंबीयांनी मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे प्रकरणात नवा पैलू समोर आला आहे.

छळाचा आरोपी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक –

फलटण उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने (PSI Gopal Badne) याने बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.

पोलिसांनी तातडीने तपास करत प्रशांत बनकर याला आज पहाटे पुण्यातील (Pune) एका मित्राच्या फार्महाऊसवरून अटक केली आहे. त्याला फलटण पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांनी आपल्या नोटमध्ये बनकरवर छळाचा आरोप केला होता.

बनकर कुटुंबीयांचा मुलावर गोवल्याचा आरोप

प्रशांत बनकरच्या (Prashant Bankar) अटकेनंतर त्याच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला मुलगा निर्दोष असून, त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. “आमचा मुलगा पुण्याला असतो, तो दिवाळीसाठी घरी आला होता. आमचा मुलगा असा नाही. त्या मॅडमने अन्याय करून गेल्या आहेत. तिने मुद्दाम नाव लिहिले,” असे बनकरच्या आईने म्हटले आहे. तर वडिलांनी, “मी तिला मुलीप्रमाणे सांभाळले, तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिने कोणाच्या दबावाखाली हे केले आहे का, हे शासनाने पहावे,” अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बलात्काराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार आहे. तो मूळचा परळीचा (Parli) असून, त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर (Pandharpur) असल्याचे समोर आले आहे. पोलिसांची पथके त्याच्या मागावर असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

News Title – prashant bankar family reveals about dr. sampada munde

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now