Prasanna Shankar | रिप्पलिंग (Rippling) कंपनीचे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर (Prasanna Shankar) यांच्यावर त्यांची माजी पत्नी दिव्या शशिधर (Divya Shashidhar) यांनी अनेक गंभीर आरोप लावले आहेत. सध्या सुरू असलेल्या घटस्फोट आणि मुलाच्या कस्टडीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आरोप केले असून त्यात खुल्या नातेसंबंधांसाठी जबरदस्ती, वेश्यांसोबत संबंध, आणि शारीरिक छळ यांचा समावेश आहे.
शरीर संबंधासाठी दबाव-
शशिधर यांनी दावा केला की प्रसन्ना (Prasanna Shankar) यांनी त्यांना इतर लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. याशिवाय त्यांनी आरोप केला की शंकर यांनी वेश्यांसोबत संबंध ठेवले आणि त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ केला. शशिधर यांच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये मुलाच्या जन्मानंतर शंकर यांनी वेदनादायक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. जेव्हा त्यांनी विरोध केला, तेव्हा त्यांना परिणामांची धमकी दिली गेली.
सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, शंकर यांनी त्यांच्या घरी लपवलेले कॅमेरे लावून पत्नीवर लक्ष ठेवले. शशिधर यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या नवऱ्यासाठी आपला करिअर सोडला आणि या नात्याने त्यांचं आयुष्य दुःस्वप्न झालं. एका ईमेलचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शंकर यांनी त्यांना वेश्यांचे फोटो व दर मिळवण्यासाठी संपर्क साधण्यास सांगितले होते.
लग्नाची सुरुवात यशस्वी, पण नंतर मतभेद-
प्रसन्ना (Prasanna Shankar) आणि दिव्याची भेट 2007 मध्ये झाली आणि 2009 मध्ये त्यांनी डेटिंग सुरू केलं. दोघेही बुद्धिमान होते आणि आपल्या करिअरमध्ये प्रगती करत होते. दिव्या यांनी केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर शेल कंपनीसाठी नेदरलँड्समध्ये काम केलं. कुटुंबाच्या विरोधानंतरही त्यांनी विवाह केला.
शंकर यांनी 2015 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका हेल्थकेअर स्टार्टअपमध्ये इंजिनिअरिंग डायरेक्टर म्हणून काम सुरू केलं. मात्र SEC च्या चौकशीनंतर कंपनीतून राजीनामा दिला. 2017 मध्ये त्यांनी रिप्पलिंगची सह-स्थापना केली. सहकाऱ्यांनी त्यांना उत्तम इंजिनिअर म्हटलं, पण पत्नीच्या मते ते घराकडे दुर्लक्ष करत होते. दिव्याच्या म्हणण्यानुसार, शंकर सतत लैंगिक संबंधांची मागणी करत होते.






