संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक का नाही?; अजितदादांना राष्ट्रवादीच्याचं आमदाराचा सवाल

On: December 27, 2024 2:13 PM
Santosh Deshmukh 
---Advertisement---

Santosh Deshmukh l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर, या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आणि लोकांमध्ये देखील रोष दिसून येत आहे. मात्र आता या प्रकरणावरून अजित पवार गटाच्या नेत्याने अजितदादांना चांगलंच घेरलं आहे.

खंडणी आणि हत्येतील आरोपी अद्यापही मोकाट कसे? :

संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या आधीच अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अजितदादांना घेरलं आहे. यावेळी आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे.

मात्र जर या दोन्ही बड्या नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी अद्यापही मोकाट कसे? तसेच त्यांना अजून अटक का नाही? असा सवाल आमदार प्रकाश सोळंके यांनी विचारला आहे.

Santosh Deshmukh l हत्येमागे नक्कीच कोणाचा तरी दबाव :

आमदार प्रकाश सोळंके पुढे म्हणाले की, या घटनेतील आरोपी आणि खंडणीखोरांना अजूनही अटक का झाली नाही? तसेच यामागे राजाश्रय असल्याशिवाय या गोष्टी होतात का? तसेच एक आरोपी 18-18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता देखील येत नाही. तसेच खून करणाऱ्याला देखील पकडता येत नाही. परंतु, हे काही नॉर्मल आहे का? यामध्ये नक्कीच कोणाचा तरी दबाव आहे, त्याशिवाय हे सगळं होणार नाही, असा हल्लाबोल प्रकाश सोळंके यांनी केला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणेला हाताशी घेऊन खंडणी वसूल करण्याचं काम झालं आहे. मात्र याला कोण जबाबदार आहे? या सर्व प्रकरणामागे कोण आहे? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवलं पाहिजे असं देखील प्रकाश सोळंके यांनी म्हंटल आहे.

News Title : Prakash Solanke Santosh Deshmukh Murder

महत्वाच्या बातम्या –

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

पुण्यात ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला, कारण वाचून थक्क व्हालं

जानेवारीत तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार; पाहा सुट्ट्यांची यादी

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!

आज ‘या’ 6 राशीच्या व्यक्ती मालामाल होणार!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now