“मुस्लिम धर्मगुरुंनी धोका दिल्याने जरांगेंनी माघार..”; मनसे नेत्याची प्रतिक्रिया

On: November 4, 2024 2:59 PM
Prakash Mahajan on Manoj Jarange decision
---Advertisement---

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी आपली राजकीय भूमिका जाहीर केली होती. कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आणि कुठे उमेदवार पाडायचे याबाबत त्यांनी मोठी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला, यावरून आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. अशातच मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. (Manoj Jarange)

काय म्हणाले प्रकाश महाजन?

“जरांगे पाटील यांनी का माघार घेतली हे तेच स्पष्ट सांगू शकतात. जरांगे पाटील यांना मुस्लिम धर्मगुरुंनी धोका दिला म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असावी, असं मला वाटते. मौलाना नौमानी यांचे जे वक्तव्य आहे, त्यातून हिंदूधर्म मानणाऱ्या पक्षाच्या विरोधात मुस्लिमांना मतदान करायचे आहे. जे हिंदूंना आपलं मानतात त्यांच्या विरोधात मुस्लिम मतदान करणार हे निश्चित आहे.”, असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

“मनोज जरांगे साधे, सरळ आणि भोळे व्यक्ती आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मुस्लीम धर्मगुरुंनी धोका दिला म्हणून त्यांनी निवडणूकमध्ये उमेदवार न देण्याचा असा निर्णय घेतला असावा, असे मला वाटते”, असंही प्रकाश महाजन म्हणाले आहेत. (Manoj Jarange)

मनोज जरांगे यांनी माघार का घेतली?

“आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. पण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य होणार नाही. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल, त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतलाय.”,असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असं आवाहन देखील जरांगे (Manoj Jarange )यांनी केलंय.

News Title –  Prakash Mahajan on Manoj Jarange decision

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!

मविआच्या मागणीला यश, अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं

मनोज जरांगेंच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची खरपूस प्रतिक्रिया; म्हणाले…

HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!

जरांगेंनी माघार घेण्याचं कारण सांगितलं; म्हणाले, “उमेदवार पडला तर जातीचं हसू..”

Join WhatsApp Group

Join Now