सत्ता स्थापनेबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले..

On: November 22, 2024 12:02 PM
Prakash Ambedkar
---Advertisement---

Prakash Ambedkar | अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आता विधानसभेच्या निकालाकडे लागले आहे. उद्या 23 नोव्हेंबररोजी कोण बाजी मारणार, ते स्पष्ट होईल. मात्र, त्यापूर्वीच ‘राज्यात सत्ता आम्हीच स्थापन करू’ असे दावे केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विजयी जागांच्या आकडेवारीबाबतही दावा केला जातोय. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष आणि इतर उमेदवारांची भूमिकाही महत्वाची असणार आहे. (Prakash Ambedkar)

बऱ्याच पोल्समध्ये कोणत्याच आघाडीला बहुमत मिळणार नाही, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे सत्ता स्थापनेत अपक्ष विजयी उमेदवारांची भूमिका ही प्रमुख ठरण्याची शक्यता आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर करण्यात आली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट करून निकालापूर्वीच मोठं वक्तव्य केलं आहे.

पोल्सच्या अंदाजानुसार, राज्यात युती किंवा आघाडी सरकारला सत्तास्थापनेसाठी अपक्ष तसेच लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार, असं भाकीत वर्तवलं जात आहे. त्यातच वंचित कुणाला पाठिंबा देणार, याबाबत बोललं जात होतं. यासंदर्भातच प्रकाश आंबेडकर यांनी पोस्ट करत कुणाला पाठिंबा देणार, ते जाहीर केलं आहे. (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर यांचं ट्वीट-

“जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ. आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू!”, अशी पोस्ट वंचितच्या अधिकृत एक्स हँडलवर करण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत ते आगामी सरकार कुणाचंही असलं तरी ते सत्तेत असणार याचे संकेत दिले आहेत. उद्या निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचं हे ट्वीट आता व्हायरल झालं असून त्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

News Title –  Prakash Ambedkar tweet in discussion

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपकडून अपक्षांना ‘इतक्या’ कोटींची ऑफर?; राजकारणात खळबळ

विधानसभा निवडणुकीत विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांची यादी आली समोर!

कॉँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ जागा येणार?, नाना पटोलेंनी CM पदाबाबतही केला मोठा दावा

‘बटेंगे तो कटेंगे’वर होणार कारवाई?

अजित पवार ‘या’ तारखेला CM पदाची शपथ घेणार; बड्या नेत्याचा दावा

Join WhatsApp Group

Join Now