“फक्त लोकप्रियतेसाठी वापर करणे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

On: April 29, 2025 8:36 PM
prajakta mali
---Advertisement---

Prajakta Mali | मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या आपल्या खास विचारांनी चर्चेत आहे. झी युवावरील ‘कॉफी विथ क्रश’ या शोच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणाऱ्या प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मानवी नातेसंबंधांबाबत विचार मांडले. तिच्या मते, नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते प्रामाणिक आणि खोल भावनिक पातळीवर उभं राहतं. सोशल मीडियावरच्या आभासी जगात जगणाऱ्या पिढीला हे समजण्याची गरज आहे, असं मतही तिने व्यक्त केलं.

खोटेपणाच्या नात्यांना मुळं नसतात-

प्राजक्ताच्या (Prajakta Mali) मते, नातेसंबंध टिकवण्यासाठी केवळ स्टेटस किंवा भौतिक गोष्टी उपयोगी पडत नाहीत. “प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा हे कोणत्याही नात्याचं खऱ्या अर्थानं बळ असतं. खोटं वागणं, दाखवलेली मैत्री किंवा वरवरचं प्रेम – याला फार दिवस टिकाव लागत नाही,” असं ती स्पष्टपणे सांगते. तिने असेही नमूद केलं की, फक्त लोकप्रियतेसाठी नात्यांचा वापर करणे ही समाजातली एक धोकादायक प्रवृत्ती बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताचं नात्यांकडे पाहण्याचं दृष्टिकोन वेगळा-

तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारल्यावर प्राजक्ताने (Prajakta Mali) सांगितले की, “कोणतंही नातं फक्त साजरं करण्यासाठी असू नये, ते जगण्यासाठी असावं. मी आयुष्यात केवळ नातं ठेवण्यासाठी कधीच नातं जोडत नाही. समोरच्याबद्दल आपुलकी आणि जबाबदारी असेल तरच ते नातं खऱ्या अर्थाने साकार होतं.” आजच्या बदलत्या सामाजिक संदर्भात तिचे विचार एक वेगळी सकारात्मक दृष्टी देतात.

News Title – prajakta mali talks on Real Bonds and Honest Connections

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now