प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

On: November 23, 2024 10:51 AM
prajakta mali
---Advertisement---

Prajakta Mali | मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर देखील प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्राजक्ताने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे.

प्राजक्ताच्या (Prajakta Mali) चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. दरम्यान, प्राजक्ताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

चाहत्यांसाठी व्हिडीओ शेअर-

प्राजक्ता (Prajakta Mali) आपल्या चाहत्यांसाठी कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा ‘फुलवंती’ हा चित्रपट चर्चेत आला होता. या चित्रपटातील मदमंजरी या गाण्याने सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. शिवाय या गाण्यावर प्राजक्ताचा नृत्य देखील चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या अधिकृत अकाउंटवर प्राजक्ताने या चित्रपटा विषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

काय म्हणाली प्राजक्ता?

‘फुलवंती’ चित्रपटामधील नृत्य आणि बहारदार संगितामुळे देखील प्राजक्ता चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. अशातच आता प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सर्वांचे आभार मानत एक आनंदाची बातमी दिली आहे. Amazon Prime वर देखील ‘फुलवंती’  चित्रपट उपलब्ध आहे. चित्रपटगृहासोबतच OTT वर देखील या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आह.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे फुलवंतीचं आज सातव्या आठवड्यात पदार्पण झालं आणि याच निमित्ताने आपला चित्रपट आता Amazon Prime वर पहायला मिळणार असल्याचं प्राजक्ता म्हणाली. ‘फुलवंती’ वर जितकं प्रेम तुम्ही चित्रपटगृहात केलं, तितकंच प्रेम या माध्यमात देखील कराल याची खात्री आहे.

News Title : Prajakta Mali shares new video

महत्त्वाच्या बातम्या-

‘राज’पुत्र अमित ठाकरे आघाडीवर की पिछाडीवर?, माहीमचा निकाल पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा

परळीत धनंजय मुंडे जोमात, तब्बल ‘इतक्या’ हजार मतांनी घेतली आघाडी!

विधानसभा LIVE अपडेट्स! पाहा कोण किती मतांनी आघाडीवर

राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात

बारामतीत ‘पवार घराण्याची’ प्रतिष्ठा पणाला..! काका-पुतण्याच्या लढाईत कुणी घेतली आघाडी?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now