“आयुष्यात छान गोष्ट घडली…”, प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत दिली गूड न्यूज

On: November 24, 2024 5:42 PM
prajkata mali
---Advertisement---

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीने सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. छोट्या पडद्यावरील एका मराठी मालिकेनंतर प्राजक्ताला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. मराठी आणि हिंदी वेब सिरीजमध्ये प्राजक्ताने मुख्य भूमीका बजावल्या. आपल्या पर्सनल लाईफ बरोबरच ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे देखील अनेकवेळा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा नवा चित्रपटा प्रेक्षकांच्या भेटीला आला. फुलवंती असं तिच्या चित्रपटाचं नाव होतं. स्वतः प्राजक्ताने या चित्रपटाची निर्मीती केलीये. दरम्यान, आपल्या चाहत्यांसाठी प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

चाहत्यांसाठी गुड न्यूज-

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा (Prajakta Mali) ‘फुलवंती’ हा चित्रपट चर्चेत आला होता. या चित्रपटातील मदमंजरी या गाण्याने सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. शिवाय या गाण्यातील प्राजक्ताचा नृत्य देखील चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या अधिकृत अकाउंटवर प्राजक्ताने या चित्रपटा विषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

व्हिडीओमध्ये काय म्हणाली?

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता (Prajakta Mali)  म्हणाली की, हॉलिवूडचे चित्रपट तिथे असताना फुलवंतीला जास्त व्ह्यूज मिळाले, अशी माहिती प्राजक्ताने या व्हिडिओमध्ये दिली आहे. फुलवतींने हा बनवलेला नवीन रेकॉर्ड खरोखरंच कौतुकास्पद असून प्राजक्ताने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. व्हिडीओ शेअर करत ती असंही म्हणाली की “आयुष्यात छान गोष्ट घडली”.

या मराठी चित्रपटाने चक्क हॉलिवूड सिनेमालाही मागे टाकत रेकॉर्ड रचला आहे. प्राजक्ताने ही बातमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देत प्रेक्षकांचे आभारही मानले. हॉलिवूडच्या चित्रपटांसमोर आपल्या मराठी चित्रपटाने मोडलेला रेकॉर्ड आणि त्याची पसंती पाहता या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

News Title : prajakta mali shares good news to fans

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

महायुतीतील 6 नेत्यांना मिळणार विधानपरिषदेची संधी, कोणाला लागणार लॉटरी?

निकालानंतर ‘या’ मोठ्या पदावर अजित पवारांची नियुक्ती!

संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; कोणाला किती मिळणार मंत्रिपदं

निकालानंतर EVM विरोधात याचिका कोण दाखल करणार?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now