“त्यांच्यामुळे माझं लग्न…”, लग्नाबद्दल प्राजक्ता माळीचा नवा खुलासा

On: December 2, 2024 7:58 PM
prajakta mali
---Advertisement---

Prajakta Mali | मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर देखील प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्राजक्ताने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

काय म्हणाली प्राजक्ता?

प्राजक्ताच्या (Prajakta Mali) चाहत्यांना तिच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. तु लग्न कधी करणार असा प्रश्न प्राजक्ताला तिच्या चाहत्यांकडून कायम विचारला जात असतो. दरम्यान, प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला आहे. माहितीये का अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची इच्छा आहे की मी लग्न करू नये, असं प्राजक्ता म्हणाली.

त्यांच्यामुळे रखडतंय सगळं-

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

पुढे बोलत असताना ती म्हणाली की,  अर्धे माझ्या लग्नाची वाट बघतायत आणि अर्धे नाही व्हायला पाहिजे असं म्हणतायत त्यांच्यामुळे माझं लग्न रखडतंय खरंतर. त्या मुलांमुळे माझं लग्न होत नाहीये ज्यांना असं वाटतंय की नाही नाही मला हिला भेटायचंय. मी हिला भेटल्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे. त्यांच्यामुळे रखडतंय सगळं. मी काय करू आता.

प्राजक्ता (Prajakta Mali) आपल्या चाहत्यांसाठी कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा ‘फुलवंती’ हा चित्रपट चर्चेत आला होता. या चित्रपटातील मदमंजरी या गाण्याने सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. शिवाय या गाण्यावर प्राजक्ताचा नृत्य देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

News Title : prajakta mali reveals about her marriage

महत्त्वाच्या बातम्या-

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट, ‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे

“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!

उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेनी मौन सोडलं

महत्वाची बातमी! डिसेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

अजितदादांचा शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेंना दे धक्का; दोन बडे नेते गळाला?

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now