Prajakta | स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा साखरपुडा पार पडला असून, आता तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या केळवणाचे खास फोटो शेअर केले असून, तिच्या लग्नाची तारीखही जवळ आली आहे.
केळवणाची पहिली पंगत-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिचा विवाह २ डिसेंबर रोजी निश्चित झाला आहे. लग्नाची पत्रिका देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि आई तुळजाभवानीचा (Tuljabhavani) आशीर्वाद घेण्यासाठी ती नुकतीच तुळजापूरला (Tuljapur) गेली होती. यावेळी तिने देवीचा हिरव्या बांगड्यांचा चुडाही भरला. यानंतर तिच्या घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, नातेवाईकांनी तिच्यासाठी खास केळवणाचे आयोजन केले होते.
प्राजक्ताने (Prajakta) तिच्या या पहिल्या केळवणाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये केळवणासाठी केलेली सुंदर सजावट आणि जेवणातील विविध पदार्थांची झलक पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस ४’ (Bigg Boss Season 4) मुळे चर्चेत आलेल्या प्राजक्ताचा ७ ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला होता, तेव्हापासूनच तिच्या लग्नाच्या लूकबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
अशी झाली होणाऱ्या पतीशी भेट-
प्राजक्ता (Prajakta) एका मोठ्या उद्योजकाची सून होणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव शंभुराज खुटवड (Shambhuraj Khutwad) असे असून, तो एक यशस्वी उद्योजक आहे. या दोघांची ओळख एका अपघातामुळे झाली होती, जी खूपच रंजक आहे.
काही काळापूर्वी, प्राजक्ताच्या (Prajakta) गाडीला एका ट्रकने धडक दिली होती. हा ट्रक शंभुराज (Shambhuraj) यांच्या मालकीचा होता. अपघातामुळे प्राजक्ताच्या (Prajakta) गाडीचे नुकसान झाले होते, त्यामुळे शंभुराज (Shambhuraj) स्वतः तिला सेटवर सोडवण्यासाठी गेले होते. या पहिल्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे शंभुराज (Shambhuraj) यांनी तिला लग्नासाठी मागणी घातली, ज्याला तिने होकार दिला.






