प्रज्ञा ठाकूर निर्दोष! बॉम्बस्फोटाशी संबंध नाही!, कोर्टाने साध्वीच्या वादग्रस्त बाईकबद्दल दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

On: July 31, 2025 11:59 AM
Pragya Thakur Bike
---Advertisement---

Pragya Thakur | देशभरात चर्चेत असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना NIA न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. तब्बल 17 वर्ष चाललेल्या खटल्यात आज न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी निकाल दिला.

या निकालात न्यायालयाने स्पष्ट केलं की, बॉम्बस्फोटात वापरलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञा सिंह यांची होती हे सिद्ध करता आलेलं नाही. (Pragya Thakur Bike News)

कोर्टाने नेमकं काय म्हटलं? :

स्फोटात वापरलेली बाईक साध्वीची होती हे ठोसपणे सिद्ध झालं नाही, कारण… चेसिस नंबर पूर्णपणे स्पष्ट नव्हता. फक्त नंबर प्लेटवरून ओळख निश्चित करता आली नाही. तसेच बाईक तिच्या नावावर असली तरी वापरात होती का? हेही तपासातून निष्पन्न झालं नाही.

दरम्यान, बॉम्ब त्या बाईकवर ठेवला होता हे सिद्ध करणारे पुरावे देखील सादर करण्यात आले नाहीत. तसेच घटनास्थळी साध्वीचे बोटांचे ठसे किंवा इतर कोणतेही जैविक पुरावे सापडले नाहीत. याशिवाय मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्समधून देखील त्यांचा थेट सहभाग सिद्ध झाला नाही.

साध्वीच्या नावाने बाईक असली तरी त्या काळात त्या आधीच संन्यासी झाल्या होत्या, भौतिक संपत्तीपासून दूर गेल्या होत्या, असं कोर्टाने निरीक्षणात नमूद केलं.

Pragya Thakur | सरकारी यंत्रणांच्या तपासावरही प्रश्न :

या खटल्याचा तपास नाशिक पोलीस, ATS, नंतर CBI आणि अखेरीस NIA ने केला. पण 17 वर्षांच्या तपासानंतरही न्यायालयाने म्हटलं की, “कट रचल्याचे ठोस पुरावे रेकॉर्डवर उपलब्ध नाहीत. आरोपींमध्ये बैठका झाल्याचे पुरावेही सादर करता आलेले नाहीत.” (Pragya Thakur Bike News)

दरम्यान, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळणार आहे, विशेषतः राजकीय स्तरावर, कारण NIA व इतर तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. याशिवाय पीडित कुटुंबीयांमध्ये नाराजी वाढू शकते, कारण 17 वर्षांच्या न्यायप्रक्रियेनंतरही कोणीही दोषी ठरलं नाही.

News Title: Pragya Thakur Acquitted in Malegaon Blast Case: NIA Court Says Bike Link Not Proven

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now