PPF Rules | पोस्ट ऑफिसच्या प्रसिद्ध स्मॉल सेव्हिंग स्कीमसंदर्भात अर्थ मंत्रालयांतर्गंत येणाऱ्या आर्थिक प्रकरणांबाबत मोठे बदल केले जाणार आहेत. यासाठी नॅशनल स्मॉल सेव्हिंग (NSS)च्या योजनांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. या नवीन नियमांचे पालन न केल्यास खाते बंद होऊ शकते. याचा उद्देश बचत योजनांतर्गंत उघडण्यात आलेली अनियमित खाते नियमित करणे हा आहे. (PPF Rules)
अर्थ मंत्रालयाने लहान बचत खात्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार विभागाने सहा नवीन नियम जारी केले आहेत, जे राष्ट्रीय बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी खात्यावर लागू होणार आहेत. यासाठी सहा श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विसंगत NSS खात्यांचे नियमितीकरण, अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेली PPF खाती, अनेक PPF खाती, NRI-विस्तारित PPF खाती आणि सुकन्या समृद्धी खाती (SSA) श्रेण्यांव्यतिरिक्त आजी-आजोबांनी उघडलेली खाती आहेत. (PPF Rules)
नवीन बदल कोणते?
सुकन्या समृद्धी खाते योजना 2019 च्या पॅरा 3चे उल्लंघन करून एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक खाते उघडले असल्यास अनियमित खाती योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून उघडलेली खाती मानून बंद केली जातील.
तसेच, आजी-आजोबा ( जे कायदेशीर पालक नाहीत) त्यांनी सुरू केलेल्या खात्यातील पालकाचे नाव बदलावे लागणार आहे. मूळ किंवा कायदेशीर पालकाने हे करणे गरजेचे आहे. जर एखाद्या ग्राहकाने योजनेचे नियम तोडले आणि दोनपेक्षा जास्त खाती उघडली तर अतिरिक्त खाते बंद केले जाईल. (PPF Rules)
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवर सध्या 8.2% व्याजाचा लाभ दिला जात आहे. या व्याजदरासह योजना कलम 80 सी अंतर्गत करमुक्तही आहे. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात किमान 250 तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तसेच आर्थिक वर्षात किमान250 रुपये जमा न केल्यास 50 रुपये दंड आकारला जाईल.
तसेच, अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या अकाउंटवर अल्पवयीन 18 वर्षांचा होईपर्यंत (POSA) पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट व्याज उपलब्ध होणार आहे. त्यानंतर पीपीएफचा दर लागू होणार आहे.
यासोबतच राष्ट्रीय बचत योजनेशी संबंधित तीन प्रकारच्या खात्यांसाठी देखील नियम बदलण्यात आले आहेत. एप्रिल 1990 पूर्वी उघडलेल्या दोन खात्यांचा आणि त्यानंतर उघडलेल्या दोनपेक्षा जास्त खात्यांचा यात समावेश आहे. त्यानुसार, पहिल्या प्रकारच्या खात्यांसाठी 0.20 टक्के अतिरिक्त पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज जोडले जाईल. उर्वरित खात्यांवर सामान्य व्याज मिळणार आहे. तर, तिसऱ्या प्रकारच्या खात्यावर कोणतंही व्याज मिळणार नाही. त्यांची मूल रक्कम परत केली जाईल.
दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, PPF, NPS, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न, किसान विकास पत्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, आवर्ती ठेव इत्यादींचा समावेश आहे. सरकारने या योजनांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सरकारकडून प्रस्तावित नवीन बदल हे आता 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू केले जाणार आहेत. (PPF Rules)
News Title – PPF Rules be changed from october 1
महत्त्वाच्या बातम्या-
महिलांना अशाप्रकारे घरबसल्या करता येणार पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार
नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
कुठे ओसरणार तर कुठे बरसणार?, पावसाबाबत IMD कडून महत्वाची अपडेट






