सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत

On: July 26, 2024 3:52 PM
Potato price increased
---Advertisement---

Potato price increased | देशभरात सध्या सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजी पाल्यांचे दर वाढताना दिसले. टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्याचे दर गगनाला भिडल्याचं दिसून आलं. बदलत्या हवामानाचा पीकांवर गंभीर परिणाम (Potato price increased) झालाय.

सध्या पाले भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरले आहेत. मात्र, कांदा-टोमॅटोचे दर अजूनही वरचढच आहेत. मुंबई, दिल्ली तसेच कोलकाता यांसारख्या शहरात टोमॅटो 100 रुपये किलोच्या भावाने विकले जात आहेत. राज्यातही बऱ्याच भागात टोमॅटोचे दर कडाडले आहेत. अशात बटाट्याचे दर देखील वाढतच चालले आहेत.

प्रमुख बटाटा उत्पादक राज्यांमध्ये बटाटा पिकावर परिणाम

खराब हवामानामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये बटाटा पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे कांदा, टोमॅटोप्रमाणे बटाट्याचे भावही वाढू लागले आहेत. टोमॅटो, कांदा आणि बटाट्याची महागाई 48.4 टक्क्यांवर पोहोचली आहे.

बटाट्याचे दर असेच वाढत राहिले तर, ऑक्टोबरपासून बाजारात तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बाजारात बटाट्याचा तुटवडा भासत असतो. मात्र, यावेळी (Potato price increased) आतापासूनच तुटवडा जाणवू लागला आहे.

भूतानसह इतर देशातून बटाट्यांची आयात होण्याची शक्यता

यामुळे केंद्र सरकारने देखील हालचाली वाढवल्या आहेत. सरकार सध्या व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात बटाटे आयात करण्याची परवानगी देऊ शकते. भूतानमधून बटाटे खरेदी करण्यास सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली होती. जून 2024 पर्यंत परवान्याशिवाय व्यापारी भारतात बटाटे आणू शकत होते. गेल्या वर्षी (Potato price increased) भारतात 60.14 दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन झाले होते. यंदा बटाट्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

भारत देश हा बटाटा उत्पादनाच्या बाबतीत जगात दुसऱ्या नंबरवर आहे. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, यावर्षी देशात बटाट्याचे उत्पादन सुमारे 58.99 दशलक्ष टन असण्याची शक्यता आहे. सरकार सध्या दर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार करत आहे.

News Title –  Potato price increased

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन

महिलांनी आपल्या जीवनात ‘या’ सहा गोष्टी कुणालाही सांगू नयेत; अन्यथा वैवाहिक जीवन..

मुंबईत पावसामुळे दाणादाण, आजही रेड अलर्ट जारी; पोलिसांकडून मुंबईकरांना महत्वाच्या सूचना

लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल; आता थेट..

“..पेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नाही”; परिणीती चोप्राच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?

Join WhatsApp Group

Join Now