Post Office | ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारकडून सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS)चालवली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळतात. या स्कीममध्ये (Post Office) तुम्ही अगदी घरबसल्या बक्कळ कमाई करू शकता. या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊयात.
या पोस्ट ऑफिस योजनेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर तर मिळणारच, यासोबतच दरमहा नियमित उत्पन्न देखील मिळेल. तसेच सरकार स्वतः गुंतवणुकीवर सुरक्षिततेची हमी देते. त्यामुळे ही योजना तुम्हाला मालदार बनण्याची मोठी संधी देणार आहे. प्रत्येक व्यक्ती कमाईचा एक भाग बचत म्हणून बाजूला ठेवत असतो. हा पैसा आपण चांगल्या ठिकाणी गुंतवत असतो.
Post Office Senior Citizen Scheme
पुढे हीच गुंतवणूक आपल्याला कठीण प्रसंगी कामी येते. त्यापैकीच एक पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम आहे, जी खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि याला गुंतवणुकीवर 8.2 टक्के व्याज मिळत आहे.
या योजनेत जर एखाद्या व्यक्तीने 30 लाख रुपये गुंतवल्यास त्याला यावर 2.46 लाख रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच महिन्याला 20,500 रुपये मिळतील. यातून रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न मिळू शकते. POSSC मध्ये उपलब्ध असलेल्या व्याजदराबद्दल सांगायचे तर, 1 जानेवारी 2024 पासून सरकार त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2 टक्के दराने ऑफर करत आहे.
1000 रुपयांपासून करता येईल गुंतवणूक
या स्कीमसाठी तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही पोस्ट ऑफिस योजना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती त्याच्या/तिच्या जोडीदारासह संयुक्त खाते उघडू शकते.
Post Office Senior Citizen Scheme योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तसेच कालावधीपूर्वी हे खाते बंद केल्यास, खातेधारकाला नियमानुसार दंड भरावा लागतो. याचे खाते तुम्ही जवळपासच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता. या योजनेंतर्गत काही प्रकरणांमध्ये वयातही सूट देण्यात आली आहे. या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम देण्याची तरतूद आहे.
News Title- Post Office Senior Citizen Schemes 2024
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांच्या पुढे, जाणून घ्या लेटेस्ट दर
“..तर मी स्वतः आंदोलनात उतरेल”; MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात
बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांबाबत घेतला मोठा निर्णय!
व्यवसायात भरभराट ते धनप्राप्तीचा योग, ‘या’ राशींचे येणार सोनेरी दिवस






