Post Office | प्रत्येक व्यक्ती कमाईचा एक हिस्सा भविष्यासाठी बाजूला ठेवत असतो. अडचणीच्या क्षणी हाच पैसा कामी येतो. मात्र, गुंतवणूक नेमकी कुठे करावी, त्याचा परतावा जास्त असेल की नाही?, याबाबत अनेक प्रश्न पडतातच. अशात बाजारात देखील गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. (Post Office )
मात्र, सुरक्षेची खात्री आणि भरघोस परतावा मिळेली की नाही, याबाबत शंकाच असते. आता तुम्हाला सरकारच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला लखपती बनण्याची खात्री देईल. या लेखात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या लेखात तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला विश्वासाची हमी देते. ही योजना सरकारी असल्यामुळे जोखीम नाही, त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना
सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या योजनामध्ये पैसे गुंतवणूक करायचे असतील तर, पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. 15 वर्षांच्या कार्यकाळातील ही योजना प्रत्येक सामान्य माणसाला कोट्यधीश बनवू शकते.(Post Office )
व्याजदर किती असणार?
PPF योजनेतील गुंतवणुकीवर सध्या 7.1 टक्के व्याज दिले जाते. हे व्याज कमी-जास्त होऊ शकते. यासोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टॅक्सचे फायदेही मिळतात. कोणतीही व्यक्ती पीपीएफमध्ये वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकते आणि किमान ठेव मर्यादा वार्षिक 500 रुपये आहे.
ही योजना 15 वर्षांत मॅच्युअर होत असली, तरी ती 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये देखील वाढवता येते. म्हणजेच, तुम्हाला किमान 25 वर्षांसाठी वार्षिक 1.5 लाख रुपये (12,500) जमा करावे लागतील. एकूण 25 वर्षांत तुम्ही एकूण 37,50,000 रुपये या योजनेत गुंतवाल. 7.1 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज मिळेल. (Post Office )
PPF योजनेद्वारे बना कोट्यधीश
अशा प्रकारे, तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह 25 वर्षांनंतर तुम्हाला तब्बल 1,03,08,015 रुपये मिळतील. तुम्ही याचा कालावधी अजूनही वाढवू शकता. म्हणजेच, तुम्ही या योजनेत 30 वर्षे योगदान दिले तर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम म्हणून 1,54,50,911 रुपये मिळू शकतात.(Post Office )
News Title – Post Office PPF scheme 2024
महत्त्वाच्या बातम्या-
रोज सकाळी फक्त 1 किलोमीटर चालल्याने किती कॅलरिज बर्न होतात?
निक्कीच्या ‘त्या’ वागण्यामुळे अरबाजने घरात केली तोडफोड; बिग बॉस काय करणार?
बँकेत नोकरी करायचं स्वप्न होणार साकार; तब्ब्ल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु
“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट






