Post Office Monthly Income Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office Monthly Income Scheme) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने काढली आहे. ज्यामुळे तुम्ही महिन्याला जवळपास 10 हजारांची कमाई करू शकता.
ही पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना आहे. तुम्ही त्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मासिक फायदे मिळू लागतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे उत्पन्न मिळविण्यासाठी तुम्ही किती पैसे गुंतवू शकता , यावर किती व्याज दिले जाईल आणि या योजनेअंतर्गत मासिक उत्पन्नाचा लाभ किती काळ मिळेल?, याबाबत सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
योजनेबाबत अधिक माहिती-
Post Office Monthly Income Scheme ही एकप्रकारे पेन्शन योजना सारखीच आहे. यामध्ये एकदा पैसे जमा केल्यानंतर, तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दरमहा हमी उत्पन्न मिळेल. यात तुम्हाला एकल किंवा संयुक्त खात्यातून गुंतवणूक करता येते. एकल खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते, तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
या योजनेत एक प्रौढ व्यक्ती स्वतःच्या नावाने एकच खाते उघडू शकतो, तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती एकत्रित खाते उघडू शकतात. एका खात्यात कमाल ठेव मर्यादा 9 लाख रुपये आहे, तर संयुक्त खात्यात कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपये आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर चालू (Post Office Monthly Income Scheme) तिमाहीसाठी वार्षिक 7.4 टक्के व्याजदर आहे. या खात्यात जमा झालेला निधी, त्यावर मिळणारे वार्षिक व्याज 12 भागांमध्ये विभागले गेले आहे आणि प्रत्येक भाग तुमच्यासाठी मासिक उत्पन्न म्हणून काम करतो, जो तुम्ही दरमहा काढू शकता. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे, परंतु 5 वर्षानंतर ती नवीन व्याजदरानुसार वाढवता येते.
Post Office Monthly Income Scheme Interest Calculator
जॉइंट अकाऊंटचे कॅलक्युलेशन
संयुक्त खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक: 15 लाख रुपये
व्याज दर: वार्षिक 7.4 टक्के
वार्षिक व्याज: 1,11,000 रुपये
मासिक व्याज: 9250 रुपये
सिंगल अकाऊंटचे कॅलक्युलेशन
एकल खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक: 9 लाख रुपये
व्याज दर: वार्षिक 7.4 टक्के
वार्षिक व्याज: 66,600 रुपये
मासिक व्याज: 5550 रुपये (Post Office Monthly Income Scheme)
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
अर्जदाराचे आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते पासबुक
सध्याचा मोबाईल नंबर आणि
पासपोर्ट आकाराचा फोटो इ. (Post Office Monthly Income Scheme)
योजनेसाठी अर्ज कसा करणार?
-पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिस शाखेत जावे लागेल.
-येथे पोहोचल्यानंतर तुम्हाला “पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 – अर्जाचा फॉर्म” भरावा लागेल.
-पुढे अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबंधित शाखेत जमा करून तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता. (Post Office Monthly Income Scheme)
News Title – Post Office Monthly Income Scheme
महत्त्वाच्या बातम्या-
निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का बसणार? ‘या’ मित्रपक्षाने दिला वेगळा होण्याचा अल्टिमेटम
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ऐश्वर्याला सोडून चक्क..
“ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला”
Animal चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘तो’ डिलीटेड सीन तूफान व्हायरल!
ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव






