मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप

On: December 8, 2024 1:18 PM
Murder
---Advertisement---

Mumbai Porsche Car Accident | काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा (Mumbai Porsche Car Accident) अपघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

ही कार मुंबईतील बड्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा चालवत होता. ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण

मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी पहाटे 2:40 वाजता ही घटना घडली आहे. ध्रुव नलिन गुप्ता याच्यावर बेदरकारपणे पोर्श चालवून पार्क केलेल्या अनेक बाईक्सला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साधू वासवानी चौकाजवळील पदपथावर अनेक दुचाकी उभ्या असताना भरधाव वेगाने येणाऱ्या या पोर्श कारने त्या दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप

एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्या कारमध्ये चार पुरुष आणि एका महिलेसह पाच जण होते. ध्रुव गुप्ता याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून गाडी चालवताना त्याने दारू प्यायलेली का याचा तपास सुरू आहे. त्याच्या सोबत असलेल्या तरुणीने अपघात झाल्यानंतर एक बाटली बाहेर फेकल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ही’ अभिनेत्री अंडरवर्ल्ड डाॅनसोबत बांधणार होती लग्नगाठ, स्वतः केला खुलासा

कुणाचं ब्रेकअप तर कुणाचा घटस्फोट…; यंदा ‘या’ कलाकारांचा संसार मोडला

शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

अजितदादांच्या ‘त्या’ गोष्टीवरून तळपायाची आग मस्तकात गेली; अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

उद्या मोठी घडामोड घडणार; महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now