Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्याची “BOSS” अशी नंबर प्लेट असलेली आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार उसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती. ही कार अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात सापडली असून, पोलिसांनी ती कारवाई करत जप्त केली आहे. या कारचा नंबर “८०५५” असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी थेट जामखेडला जाऊन ही कारवाई केली. याआधीच निलेश घायवळच्या (Nilesh Ghaiwal) घरावर छापा टाकण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्या मालमत्ता, बँक खाती आणि परदेशी व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले आहे. या कारवाईनंतर घायवळच्या टोळीवर आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
घायवळचा पासपोर्ट रद्द, पोलिस तपासात नवा खुलासा :
निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असं नाव वापरल्याचं उघड झालं होतं. या गैरप्रकारानंतर पुणे पोलिसांनी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात अहवाल सादर केला होता. अखेर घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असून, याबाबतची ऑर्डर प्रदेश कार्यालयातून जारी करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे त्याच्या परदेशातील हालचालींवर मोठा परिणाम होणार आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच घायवळचा पासपोर्ट रद्द होणार असल्याचं संकेत दिले होते. पोलिसांच्या मकोका अंतर्गत कारवाईनंतर हा गुंड देशाबाहेर गेला होता. मात्र आता त्याच्या प्रत्येक आर्थिक हालचालीवर पोलिसांची नजर आहे.
Nilesh Ghaiwal | बँक खाती गोठवली; 38 लाखांची रक्कम फ्रीज :
निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) आणि त्याच्या कुटुंबीयांच्या 10 बँक खाती काही दिवसांपूर्वीच गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित बँकांमध्ये घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ आणि पृथ्वीराज एंटरप्रायझेस या नावांनी खाती असल्याचं पोलिसांना आढळलं.
पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित बँकांनी ही सर्व खाती फ्रीज केली आहेत. त्यामुळे आता एनओसीशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार घायवळ कुटुंबाला करता येणार नाही. पोलिसांनी म्हटलं आहे की, गुन्हेगारांचे आर्थिक स्रोत बंद करणं हे त्यांच्या टोळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं सर्वात प्रभावी हत्यार ठरेल.
आर्थिक नाकेबंदीने घायवळची अडचण वाढली :
पोलिसांनी केलेल्या सलग कारवायांमुळे निलेश घायवळचा आर्थिक पाया डळमळीत झाला आहे. आधी बँक खाती गोठवली, त्यानंतर पासपोर्ट रद्द झाला आणि आता ऊसाच्या शेतात लपवलेली “BOSS” नंबर प्लेटची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनांमुळे त्याचा गट अस्थिर झाला असून त्याचे साथीदार भूमिगत झाले आहेत.
घायवळच्या नावावर आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या नावावर अजून काही वाहनं व मालमत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
News Title: Police seize Nilesh Ghaywal’s BOSS number plate car hidden in sugarcane farm after freezing bank accounts and cancelling passport
Nilesh Ghaiwal, Boss number plate car, Pune police action, Jamkhed car seized, Ghaywal passport cancelled, घायवळ बातमी, निलेश घायवळ कारवाई, BOSS नंबर प्लेट कार, सातारा पोलीस कारवाई, निलेश घायवळ पासपोर्ट रद्द, घायवळ बँक खाते फ्रीज






