मलायका अरोराच्या वडिलांचा टोकाचा निर्णय; नेमकं काय झालं होतं?

On: September 11, 2024 2:11 PM
Malika Arora
---Advertisement---

Malaika Arora | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर (Malaika Arora) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचं पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे.

वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून अनिल यांनी आयुष्य संपवलं. आलमेडा पार्क या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अनिल अरोरांनी जीवन संपवलं

गेल्या अनेक वर्षांपासून अनिल अरोरा यांना प्रकृतीच्या त्रासामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मलायका आई जॉयससोबत हॉस्पिटलमध्ये दिसली होती. मात्र, त्यांच्यावर उपचाराचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. प्रकतीच्या त्रासामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे. अनिल अरोरा यांचं पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Malaika Arora मुंबईसाठी रवाना

अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका अरोरा घरी नव्हती. आज सकाळी त्या पुण्यात होत्या. घटनेची माहिती मिळताच ती मुंबईहून पुण्याकडे रवाना झाली. या बातमीनंतर अनेक सेलेब्स देखील तिच्या घरी पोहोचत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक

सर्वात मोठी बातमी! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, मटन अन् ..; संजय राऊतांनी हिंदुत्वावरून सुनावलं

कुठे अतिवृष्टी तर कुठे विश्रांती; राज्यात आज कसं राहील हवामान?

अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now