पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल, जाणून घ्या नव्या अटी

On: January 18, 2025 2:47 PM
PM-KISAN 21st Installment
---Advertisement---

PM Kisan Yojana l पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी फक्त एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) या योजनेबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. मागील काळात एकाच कुटुंबातील दोन ते तीन शेतकरी (Farmers) या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले होते.

नवीन नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे :

कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ: यापुढे एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला (Member) या योजनेचा लाभ मिळेल.

आधार कार्ड (Aadhaar Card) बंधनकारक (Mandatory): योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अपात्र लाभार्थी (Ineligible Beneficiaries): वारसा हक्क (Inheritance) वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी (Land Purchase) केली आहे, डॉक्टर (Doctor), इंजिनिअर (Engineer) जे आयकर (Income Tax) भरतात आणि पेन्शनधारक (Pensioners) यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

मागील मूल्यांकन वर्षात (Assessment Year) आयकर भरलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्राप्त करण्यास पात्र राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतला असेल तर ती रक्कम वसूल (Recovery) केली जाईल.

PM Kisan Yojana l १९ वा हप्ता कधी मिळणार? :

पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता महाराष्ट्रातील (Maharashtra) निवडणुकीपूर्वी (Election) जाहीर करण्यात आला होता. हा हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे १९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात, म्हणजे फेब्रुवारीमध्ये, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करू शकते. त्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून, तालुकानिहाय (Taluka-wise) लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवली असल्याची माहिती आहे.

पीएम किसान योजनेचा उद्देश आणि लाभ :

शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी डिसेंबर २०१८ मध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी (Implementation) सुरू आहे. योजनेचे १८ हप्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत. १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात (First Week) तो मिळण्याची आशा लाभार्थी शेतकऱ्यांना आहे.

वारंवार केवायसी का? (e-KYC)

पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे (Documents) जोडून अर्ज भरतात आणि योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी सांगितले जाते. कागदपत्रे अपलोड (Upload) केल्यानंतर पुन्हा तीच कागदपत्रे पाठवावी लागतात, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो.

Title : PM Kisan Yojana: New Guidelines and updates on 19th Installment
महत्वाच्या बातम्या- 

‘हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही’; करिनाचा धक्कादायक खुलासा

‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

रिलायन्स जिओचं मोठं पाऊल, Airtel आणि Vi पुन्हा एकदा टाकलं मागे

मोठी बातमी समोर; अर्जुन कपूर, भूमी पेडणेकरच्या शूटिंग दरम्यान दुर्घटना

आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now