PM Kisan 21st Installment | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana). या योजनेअंतर्गत, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. (PM Kisan 21st Installment)
२१ वा हप्ता कधी मिळणार? :
योजनेअंतर्गत आतापर्यंत २० हप्ते जारी करण्यात आली आहेत आणि शेतकरी आतुरतेने २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यावर्षी काही राज्यांमध्ये, जसे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब, पावसामुळे नुकसान झाले असल्यामुळे हा हप्ता २६ सप्टेंबर रोजी दिला गेला. इतर राज्यांतील शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. काही माध्यमांनी अंदाज व्यक्त केला आहे की दिवाळीपूर्वीच २१ वा हप्ता जाहीर होऊ शकतो, पण अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. (PM Kisan Payment Status)
PM Kisan 21st Installment | तुमच्याकडे हप्ता येणार आहे का? :
– PM Kisan योजनेची अधिकृत वेबसाइट: pmkisan.gov.in ला भेट द्या.
– होमपेजवर “Beneficiary List” या लिंकवर क्लिक करा.
– आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
– “Get Report” बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या नावासमोर माहिती दिसेल आणि तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी पात्र आहात की नाही हे समजू शकेल. (PM Kisan 21st Installment)
हप्ता न मिळाल्यास काय करावे? :
जर हप्ता अद्याप जमा झाला नसेल, तर तुम्ही जवळच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा PM Kisan हेल्पलाइन वर कॉल करू शकता: 155261 / 011-24300606.
सावधान राहा की तुमची सर्व माहिती अचूक भरलेली असावी, अन्यथा हप्त्याची रक्कम मिळण्यात विलंब होऊ शकतो. योग्य तपासणी करूनच शेतकरी त्यांचे हक्काचे पैसे मिळवू शकतात.






