शेतकऱ्यांनो ‘या’ दिवशी PM किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार?

On: December 26, 2024 12:29 PM
PM Kisan Yojana
---Advertisement---

PM Kisan Yojana l भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये हे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र आता शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

PM किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे ज्याचे उद्दिष्ट लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. मात्र या योजनेच्या नियमानुसार, प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. त्यानुसार ऑक्टोबरनंतर फेब्रुवारी महिन्यात 19 वा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PM Kisan Yojana l PM किसान योजनेचा हप्ता कसा चेक करायचा? :

शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन, ‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जावे. त्यानंतर तेथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करून, तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट करून सबमिट करावे.

दरम्यान, PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय निवडावा. त्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाकून नवीन मोबाईल नंबर द्यावा आणि पडताळणीसाठी सबमिट करावी. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

News Title : PM Kisan Yojana 19th Instalment 

महत्वाच्या बातम्या –

बीडचं वातावरण तापणार! वाल्मिक कराडसह 4 बड्या नेत्यांची नावे समोर

अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

आज ‘या’ राशींना मेहनतीचे फळ मिळणार? धनलाभ होणार

हे कसलं प्रेम!, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तरूणाचं भयंकर कृत्य

विनोद कांबळीच्या मदतीला शिंदेसेना, वानरसेनेनेही उभे केले २० लाख रुपये!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now