शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

On: January 25, 2025 3:42 PM
PM Kisan 20th Installment
---Advertisement---

PM Kisan Scheme | केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही, तर दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. म्हणजेच, एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. (PM Kisan Scheme )

आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले?

आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. अठरावा हप्ता जमा होऊन आता जवळपास साडेतीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

19व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

पीएम किसान सन्मान निधी योजनेची मागील म्हणजेच 18 वी किस्त ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. या हिशोबाने पुढील म्हणजेच 19 व्या हप्त्याचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे, फेब्रुवारी महिन्यात 19 वी किस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (PM Kisan Scheme )

मागील वर्षीचा हप्ता आणि 19 व्या हप्त्याचा संभाव्य कालावधी

विशेष म्हणजे, मागील वर्षी 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी झाला होता. यामुळे, याच तारखेला म्हणजेच 28 फेब्रुवारीला 19 वा हप्ता देखील जारी होण्याची शक्यता शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. अद्याप या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, 19 व्या हप्त्यासाठीचा चार महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे, हे निश्चित.

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

शेतकरी बांधव 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिना जवळ आल्याने या हप्त्याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. शासनाकडून लवकरच या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (PM Kisan Scheme )

Title : PM Kisan Scheme19th Installment Likely in February

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now