PM Kisan 21st Installment | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबवण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि थेट लाभ देणारी योजना मानली जाते. आतापर्यंत या योजनेचे २० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सर्वात अलीकडचा म्हणजे २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित करण्यात आला. (PM Kisan 21st Installment)
२१ वा हप्ता कधी मिळणार? :
योजनेनुसार, पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० आर्थिक मदत दिली जाते, जी प्रत्येकी ₹२,००० अशा तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होते. हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने मिळतो. याच पद्धतीनुसार, २१ वा हप्ता नोव्हेंबर २०२५ मध्ये, म्हणजेच दिवाळीपूर्वीच जमा होण्याची शक्यता आहे. तरीदेखील केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. (PM Kisan 21st Installment)
या वर्षी जम्मू, पंजाब, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो एकरवरील पिके वाहून गेली आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, केंद्र सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता सर्वप्रथम जमा करू शकते.
PM Kisan 21st Installment | लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी :
– शेतकऱ्यांचे नाव अधिकृत pmkisan.gov.in या पोर्टलवर नोंदलेले असणे आवश्यक आहे.
– आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.
– महसूल व कृषी विभागाकडून पात्रतेची पडताळणी झाल्यानंतरच लाभ मंजूर होतो.
सरकारने शेतकऱ्यांना सूचना केली आहे की, हप्त्यांबाबत येणाऱ्या बनावट संदेशांना बळी पडू नये. अधिकृत माहिती फक्त pmkisan.gov.in या संकेतस्थळावरच उपलब्ध असते. तसेच २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास दिवाळीच्या सणासुदीपूर्वी मोठा दिलासा मिळेल. ही रक्कम फार मोठी नसली तरी शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चांसाठी आणि सण साजरा करण्यासाठी महत्त्वाची ठरेल.






