PM Kisan 21st Installment | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 21 वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. पण याआधीच सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून काहींच्या चेहऱ्यावर दिलासा देखील दिसतोय.
तांत्रिक अडचणींवर सरकारची नजर :
गेल्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते. कारण म्हणून आधार लिकिंग, KYC अपूर्ण असणे, चुकीची बँक माहिती आणि तांत्रिक बिघाड समोर आले होते. यावेळी अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारांना कडक ताकीद दिली आहे. (PM Kisan 21st Installment)
याशिवाय गावोगावी विशेष शिबीर भरवण्यात येणार आहे. येथे शेतकऱ्यांची KYC, आधार लिंकिंग आणि बँक खात्यांची माहिती अपडेट केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळेल, तर अपात्र किंवा बोगस लाभार्थ्यांची माहिती उघड होणार आहे.
PM Kisan 21st Installment | वर्षाला 6000 रुपयांची मदत :
ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये थेट जमा केले जातात. ही मदत तीन हप्त्यांत म्हणजे दर चार महिन्यांनी 2000 रुपये अशा स्वरूपात दिली जाते.
आतापर्यंत केंद्र सरकारने 20 हप्त्यांमध्ये जवळपास 3.90 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. योजनेमुळे लाखो लहान शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत.
यासंदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे की, गाव पातळीवर शिबिरांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. पंचायत स्तरावरही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामुळे भविष्यात एकाही पात्र शेतकऱ्याचा हप्ता अडकणार नाही, अशी अपेक्षा आहे.






