पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट!

On: November 3, 2025 6:28 PM
PM Kisan 21st Installment
---Advertisement---

PM Kisan 21st Installment | देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. मात्र, ज्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्या शेतकऱ्यांना या फेरीतून वगळण्यात येईल. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ आपली माहिती तपासणे आणि अद्ययावत करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी :

2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते, म्हणजे वर्षभरात एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. आतापर्यंत सरकारने 20 हप्ते वितरित केले असून, 20 वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. त्या वेळी 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले होते. (PM Kisan 21st Installment)

आता 21 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हप्ता लवकरच जारी केला जाणार आहे. तथापि, ज्यांच्या भूमी नोंदणी किंवा बँक तपशीलात त्रुटी आहेत, त्यांना या फेरीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची आणि कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.

PM Kisan 21st Installment | ई-केवायसी का आवश्यक आहे? :

ई-केवायसी ही प्रक्रिया शेतकऱ्यांची ओळख आणि बँक खात्याची अचूकता तपासण्यासाठी वापरली जाते. ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. लाभार्थ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक टाकून e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन ती करून घेता येते. (PM Kisan 21st Installment)

सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे हप्ता जारी होण्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title: PM Kisan 21st Installment: ₹2000 to Be Credited Soon; Farmers Without e-KYC Will Not Receive Payment

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now